१० वि पास मुलांना मिळेल इथे नोकरी..! भारतीय सर्वेक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भरती.अर्ज करण्यासाठी बातमी सविस्तर वाचा
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदवार्ता घेऊन आम्ही हजर झालो आहोत. विशेषता ज्या तरुणांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असेल मात्र सरकारी नोकरीची इच्छा असेल अशा तरुणांसाठी हा एक गोल्डन चान्स राहणार आहे.
कारण की भारतीय सर्वेक्षण विभागात रिक्त जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या विभागात मोटर ड्रायव्हर-कम मेकॅनिक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठीची अधिसूचना भारतीय सर्वेक्षण विभागाने नुकतीच जारी केली आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या भारतीय सर्वेक्षण विभागाने काढलेल्या पदभरती बाबत सर्व आवश्यक माहिती थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या आणि किती रिक्त पदांसाठी निघाली भरती?
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार ड्रायव्हर कम मेकॅनिक या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदाच्या एकूण 21 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा
भारतीय सर्वेक्षण विभागाने काढलेल्या या पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. सोबतच उमेदवाराकडे अवजड व हलके वाहन चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे.
तसेच या कामाचा किमान एका वर्षाचा अनुभव देखील यासाठी आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 18 ते 27 वर्षे वयोगटातील असणे जरुरीचे आहे. ओबीसी एससी आणि एसटी कॅटेगिरी मधील उमेदवारांना मात्र नियमानुसार या ठिकाणी वयोमर्यादेत सूट दिलेली राहणार आहे.
अर्ज कसा करावा लागणार?
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https://surveyofindia.gov.in/ या लिंक वर जाऊन आपला अर्ज सादर करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक?
इच्छुक आणि पात्र उमेदवार 31 मे 2023 पर्यंत आपला अर्ज सादर करू शकणार आहेत.
जाहिरात कुठे पाहणार?
भारतीय सर्वेक्षण विभागाने काढलेल्या या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/1tKsAKXWs3afZBDCtapBNUGOTFr2t5o44/view या लिंक वर क्लिक करा.