नमस्कार मित्रांनॊ, आपण मागील दिवसांपासून सोशल मीडिया वर अनेक राजकीय नेत्यांच्या किंवा इतर फेमस व्यक्तींचे AI नि जनरेट केलेल्या इमेजेस पहिल्या आणि आपल्याला त्या सर्वांना आवडल्या देखील. सोशल मीडिया दुनियेत खूप मोठ्या प्रमाणात AI नि जनरेट केलेल्या इमेजेस व्हायरल होताना दिसत आहेत.आपण यामध्ये नितीन गडकरी यांना लष्करी वेशात पाहिलं,तसेच गिरीश महाजन यांना लष्करी वैमानिक वेशात पाहील. जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांना कार्टून वेशात तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना आपण वारकरी वेशात पहिला.आणि नेत्यांपासून माध्यमांपर्यंत सर्वानी या इमेजेस ची दखल घेतली.महाराष्ट्रातील एक तरुण अमित वानखेडे यांनी या सर्वांची छायाचित्रे AI टेकनॉलॉजि वापरून बनवली आहेत.पण आपल्या सर्वाना एक प्रश्न पडतो कि AI असे इमेजेस कश्या बनवायच्या.AI इमेजेस कशा बनवायच्या आणि त्यासाठी कोणकोणत्या सॉफ्टवेअर चा वापर आपण करू शकतो हे आपण या लेखात पाहणार आहोत.
शरद पवार असतील, सुप्रिया ताई असतील किंवा इतर नेते मंडळी असतील यांच्या या सर्व इमेजेस आर्टीफिशिअल इंटेलिजन्स वापरून बनविले आहेत. त्यामध्ये midjurney AI वापरून या सर्वांचे फोटो तयार करण्यात आलेले आहेत.
अशा इमेजेस बनविण्यासाठी
Midjurney
DALL. E२
stable Diffusion
Firefly
अशा अनेक पर्यायांचा आपण वापर करू शकतो.
परंतु या AI ला फोटो कसे बवायला येतात. त्यासाठी नक्कीच आपल्याला काहीतरी माहिती पुरवावी लागेल. आपण जी माहिती पुरवतो त्या माहितीच्या आधारेच AI आपल्याला इमेजेस जनरेट करून देत. आपण दिलेल्या माहितीच्या आधारे AI इंटरनेट वर असणाऱ्या इतर माहीतचा अभ्यास करून फोटो जनरेट करत.
नक्कीच अशी डायरेक्ट माहिती दिली तर ती आपल्या डोक्यावरून जात आहे. त्यासाठी आपण एखाद उदाहरण घेऊयात. समजा तुम्हाला खुर्चीत बसून चहा पिणाऱ्या वाघाची इमेज तयार करायची आहे. त्यासाठी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट च्या बिंग इमेज क्रीयेटरवर जावा आणि “A tiger drinking Hot Tea sititing on chair” असा सर्च करा त्यामध्ये तुम्हाला असा दिसले .
काम कुठे करायचं
बिंग इमेज क्रीयेटर ला आपण सांगितलं माणसांची इमेज तयार कर तर ते गंडत. आणि मग अशा वेळी आपल्याला वापरावं लागत Midjurney AI. जुलै २०२२ मध्ये सुरु करण्यात आलेलं इमेज जनरेट करण्यात साठी सगळ्यात लोकप्रिय आर्ट जनरेटर आहे. आपण जे आज नेत्यांचे लुक्स पाहतोय ते Midjurney AI च्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत. पण आता अजून एक प्रश्न समोर आहे त म्हणजे हे Midjurney वापरायचं कसा.Midjurney वापरण्या आधी तुमचं
DISCORD वर अकॉउंट असणे गरजेचं असत. या DISCORD ची सुरवात गेमिग क्षेत्रात झाली परंतु त्याचा वापर आता AI ला कमांड देण्यसाठी केला जाऊ लागला आहे.
आता काम कुठे करायचं हे तर कळाल,आता काम कसा करायचं हे पाहू.
DISCORD वर मेल आय डी टाकून लॉगिन केला कि Midjurney कडून तुम्हाला invitation येत. ते accept केल कि स्क्रीन वर एक चाट विंडो येते. जिथे तुम्ही इमेजेस जनरेट करू शकता. या चाट विंडो मध्ये सुरवातीला /imagic हा शब्द टाकायचा आणि त्या नंतर promt टाकायचा. promt म्हणजे आपल्याला जी image पाहिजे त्याबद्दलची माहिती. याचही उदाहरण घ्यायचं म्हणाल तर आपल्यला विराट कोहली चा कार्टून लूक बनवायचा आहे तर आपल्याला “virat kohali cricket player realistic cartoon 4k ” असा तुम्हाला promt मध्ये टाकावे लागेल. आणि एन्टर मारायचं यानंतर आपल्यापुढे विराट कोहली चे कार्टून मधील ४ फोटो येतात.
अशाच प्रकारे तुम्हाला ज्या पण images पाहिजेत आहेत त्या तुम्ही अगदी सोप्प्या पद्धतीने इथे बनवू शकता. यामधील काही सोफ्टवेर वापरण्यासाठी कदाचित आपल्याला पैसे लागू शकतात. पण तुम्ही त्या त्या वेबसाईट वर जाऊन त्याबद्दल माहित घेऊ शकता आणि मोठ्या प्रमाणात आपल्या image बिल्डिंग स्किल मध्ये सुधारणा घडवू शकता.
AI मधील नोकरीच्तया संधी
महाराष्ट्रात तलाठी भरती निघाली..! पहा तुमच्या जिल्ह्यात किती आहेत जागा.
मित्रानो हि सर्व माहिती फक्त वाचून सोडून देऊ नका तर त्या माहितीचा वोर करून अशा प्रकारे वेगवेगळ्या images बनविण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा भविष्यात मोठ्या प्रमाणात होईल. आता AI टेक्नोलॉजी वर मोठ्या प्रमाणात नोकरी च्या संधी उपलब्द होणार आहेत. त्या नोकरीच्या संधीचा फायदा घेण्यासाठी आपण अपडेट असणे खूप गरजेच आहे. हि माहिती आवडल्यास नक्कीच ती वापरून पहा आणि इतरांना देखील कळवा.