अब्दुल कलाम योजनेचे विध्यार्थ्यांना मिळणार १५,०००. १० वी आणि १२ वी च्या विधार्थ्यंना लाभ घेण्यासाठी वाचा सविस्तर बातमी
पुणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षी १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या योजनांतर्गत शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येते.
dbt.punecorporation.org या संकेत स्थळावर जाऊन विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे..!
योजनेसाठी असणाऱ्या अति व शर्ती.
१. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विध्यार्थी हा पुणे महानगर पालिका हद्दीत वास्तव्यास असावा.
२. इयत्ता १० वी किंवा १२ वी मध्ये किमान ८० टक्के गुण मिळविलेले असणे आवश्यक.
३. महानगर पालिका शाळेतील विध्यार्थी असल्यास किमान ७० % गुण मिळविलेले असणे आवश्यक.
४. रात्रशाळेत विध्यार्थी असल्यास किमान ७० % गुण मिळविलेले असणे आवश्यक.
५. मागासवर्गीय विध्यार्थी असल्यास किमान ७० % गुण मिळविलेले असणे आवश्यक.
६. विद्यार्थीनी जर ४० टक्के अपंग असेल तर किमान ६५ % गुण मिळविलेले असणे आवश्यक.
७. विद्यार्थ्याने पुढील शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतलेला असावा.
या योजनेतून किती मिळेल मदत.
दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यासाठी महानगरपालिकेच्या या दोन योजना आहेत. दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १५,०००/- (अक्षरी पंधरा हजार रुपये) रुपयांची मदत देणारी भारतरत्न मौलाना आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना असून बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २५,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार) रुपयांची मदत मिळेल..
अधिक माहितीसाठी 18001030222 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.