आयपीएलच्या 17 सामन्यांत भारताला मिळाले दोन भविष्यातील स्टार, एकाची गोलंदाजीत धूम, दुसऱ्याचा फलंदाजीत धमका.आयपीएल 2024 मध्ये मयंक यादव आणि अंगकृश रघुवंशी हे दोन स्टार मिळाले आहेत. या दोघांमधील प्रतिभा आयपीएलमधून दिसून आली आहे. यामुळे भारतीय क्रिकेटचे हे दोन भविष्यातील स्टार म्हटले जात आहेत.
मयंक यादवची चर्चा:
आयपीएलमध्ये रियान परागपासून अभिषेक शर्मापर्यंत अनेक चांगले भारतीय खेळाडू मिळाले आहेत.परंतु या घडीला मयंक यादव आणि अंगकृश रघुवंशी यांची चर्चा होऊ लागली आहे. मयंक यादव लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळत आहे. 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 20 लाख रुपयांमध्ये घेतले होते.परंतु 2024 मध्ये त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचे सोने केले
तो पहिला सामना तो आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध खेळला. त्यात 4 षटकांत 27 धावा देऊन 3 मोठ्या फलंदाजांना माघारी पाठवले आहे. या सामन्यात त्याने 155.8 किमी per hour या वेगाने गोलंदाजी करुन सर्वांना आश्चर्यचकीत केले. त्यानंतर RCB विरुद्ध त्याने 156.7 किमी per hour या वेगाने गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीसमोर जॉनी बेयरस्टो, ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमरन ग्रीन यासारखे खेळाडू थक्क झाले आहेत. आता मयंक आयपीएल 2024 मधील 2 सामन्यांत 6 बळी घेतले त्यामुळे तो पर्पल कॅपच्या स्पर्धेत आहे.
अंगकृश रघुवंशी याची जोरदार कामगिरी:
2022 मधील अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये, भारतीय क्रिकेट संघात सर्वाधिक धावा अंगकृश रघुवंशी याने केल्या होत्या. आणखी, आयपीएल 2024 च्या ऑक्शनमध्ये KKR ने त्याला 20 लाख रुपयांमध्ये घेतले. त्याने कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामान्य स्तरावर पदार्पण केले. त्याने या सामन्यांत 27 चेंडूत 54 धावांची जोरदार बॅटींग केले.