तुमच्या भेटीला येत आहे नवीन मराठी कॉमेडी मालिका!!!

मराठी मनोरंजनाच्या नव्या दिशेने अग्रसर

दिवसेंदिवस मराठी मनोरंजन सृष्टी advance होत चालली आहे. नवीन trending टेकनॉलॉजिचा उपयोग करून वेगवेगळ्या स्वरूपाची नाटके, movie, मालिका निर्माण करत आहेत आणि ते लोकांना आवडत देखील आहे आणि तसेच नवीन येणाऱ्या movie,मालिकांबद्दल लोकांना खूप उत्सुकता असते चला तर मग जाणून घेऊया नवीन येणाऱ्या शो बद्दल.

नवीन कॉमेडी शो: डॉ. निलेश साबळेच्या नेतृत्वाखाली

काही दिवसांपूर्वी झी मराठी वरून चला हवा येऊ द्या या कॉमेडी मालिकेने निरोप घेतला होता पण आता Dr. Nilesh sable पुन्हा नवीन ऊर्जाने नाव कॉमेडी शो घेऊन यायला सज्ज झाले आहेत. हा शो 20 एप्रिल पासून कलर्स मराठी वाहिनीवर स्टार्ट होणार आहे आणि नव्या शो च नाव आहे “हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!”.

डॉ. निलेश साबळे: मनोरंजनात नवीन दिशा

डॉ. निलेश साबळे यांची ही कॉमेडी ची नवीन बुलेट ट्रेन आता कलर्स मराठीवर सुपरफास्ट धावणार आहे. डॉ.निलेश साबळे आणि त्यांच्या टीम ने लोकांना एवढे हसवले कि त्यांचे जगभरात चाहते वर्ग निर्माण झाले आहेत. तसेच मराठी मनोरंजन सृष्टी बरोबरच बॉलीवूड मध्ये पण त्यांचे फॅन्स तयार झाले आहेत.

भाऊ कदम आणि ओंकार भोजने: हास्याचे सितारे

भाऊ कदम यांची निखळ विनोदी अभिनय करून वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आणि तसेच ओंकार भोजने ने पण त्याचा खास हसवण्याच्या शैलीमुळे ने तो प्रेक्षक लोकांचा लाडका झाला. हे 3 विनोदाचे हुकमी एक्के एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्या जोशात आपल्याला मनोरंजन करायला तयार झाले आहेत.

या कॉमेडी शोमध्ये कोणते नवे कलाकार असतील?

डॉ. निलेश साबळेच्या सहभागासह, भाऊ कदम आणि ओंकार भोजने ह्या विनोदवीर शोमध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण जबाबदारी डॉ. निलेश साबळेच्या हातीच आहे. यात भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे.

या कार्यक्रमात अभिनेते भरत जाधव आणि चार दशकांपासून सिनेसृष्टीत अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल यांनी दाद देण्यासाठी प्रत्येक एपिसोडमध्ये साथ दिले आहेत. रात्री 9 वाजता 20 एप्रिलपासून शनिवार-रविवार कलर्स मराठीवरती “हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!” पाहायला मिळणार आहे.

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *