आषाढी वारी निमित्त उसळला लाखोंचा जनसागर.. !

तुझ्या दर्शनाची आस,
कधी थांबायची नाही..!

उभ्या जन्मात विठ्ठला,
वारी चुकायाची नाही..!

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानले जाते.

श्री क्षेत्र आळंदी येथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आषाढी एकादशीचा आदल्या दिवशी श्री क्षेत्र  पंढरपूर येथे पोहोचते. या वारीचा मार्ग निश्चित ठरलेला असतो. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका रथात ठेवल्या जातात. या रथाच्या पुढे आणि मागे वारकरी मंडळीं आपापल्या दिंडीतून पायी चालत जातात

इतिहास

ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे पायी वारी करीत असत असे संदर्भ मिळतात.त्यांच्यानंतर ज्ञानेश्वर इत्यादी भावंडे यांनी वारीची परंपरा सुरू ठेवली.श्री हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली.तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे. श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे. या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे. पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे. सरकारने इ.स. १८५२ मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था के

पालखी मार्ग

संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुढील मार्गाने मार्गक्रमण करते.

सोहळ्यात श्रींचा पालखी सोहळा पुण्यनगरीत दोन दिवस पाहुणचार घेत 14 जूनला सासवड मुक्कामास दिवे घाटातून हरिनाम गजरात मार्गस्थ होईल.

14 आणि 15 जूनला सासवड मुक्काम करेल.

16 जूनला जेजुरीकडे प्रस्थान,

17 जूनला जेजुरीला मुक्कामी असेल.

18 जूनला लोणंद येथे सोहळा विसावेल.

19 जूनला अधिक एक दिवसाचा मुक्काम

20 जूनला तरडगाव,

21 जूनला फलटणकडे प्रस्थान करेल.

22 जूनला पालखीचा फलटणमध्ये मुक्काम असेल.

23 जूनला नातेपुते,

24 जूनला माळशिरस मुक्काम,

25 जूनला वेळापूर,

26 जूनला भंडी शेगाव,

27 जूनला वाखरी,

28 जूनला पंढरपूर,

29 जूनला आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल.

पालखी सोहळ्यात फलटण येथे 21 जून, बरड येथे 22 जूनला एक दिवसांच्या मुक्कामासाठी सोहळा विसावणार आहे. 21 जूनला फलटणकडे प्रस्थान आणि मुक्काम होईल. 22 जूनला बरड मुक्काम असेल.

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा रथ ओढण्यासाठी दरवर्षी नवी बैलजोडी त्यांना अर्पण केली जाते.यासाठी विविध कुटुंबातील बैल जोडीचे परीक्षण करून उत्तम असे बैल निवडले जातात. या जोडीने ज्ञानेश्वर माऊली हे स्वतः त्यांच्या आश्र्वावर आरूढ होऊन रिंगण करतात अशी वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे. यासाठी रथाच्या पुढे माऊलींचा अश्व म्हणजे घोडा असतो. या अश्वाला विशेष आदराचे स्थान वारीमध्ये दिले जाते.

 

Shere me

One thought on “आषाढी वारी निमित्त उसळला लाखोंचा जनसागर.. !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *