गुढीपाडव्याचा सण: आनंदाचा विश्वासाचा संगम

इंग्रजी कॅलेंडर दरवर्षी १ जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होते. परंतु प्रत्येक धार्मिक समुदायांमध्ये आपापल्या समजुतीनुसार नवीन वर्ष वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जाते. हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याचा सण अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी दिनदर्शिका मधील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून मराठी नववर्षाची सुरुवात होते आणि या दिवशी गुढीपाडव्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोक आनंदानं खरेदी करतात.गुढीपाडवा हा मराठी वर्षातील येणारा पहिला सण आहे.

गुढीपाडव्याची तारीख:

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. यावर्षी गुढीपाडवा मंगळवार ०९ एप्रिल २०२४ रोजी साजरा केला जाणार आहे. गुढी पूजनाचा शुभ मुहूर्त हिंदू दिनदर्शिकेनुसार, चैत्र महिन्याची प्रतिपदा ८ एप्रिल रोजी रात्री ११:५० वाजता सुरू होत आहे आणि ती ९ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजता समाप्त होईल.

गुढीपाडव्याची पूजाविधी:

गुढीपाडव्याच्या दिवशी, लोक सुर्योदयापूर्वी लवकर उठतात आणि गुढी उभारतात. पहाटे सूर्योदयाच्या आधी, अंगाला उटवतात आणि सुगंधीत तेल अभ्यंग स्नान करतात. दरवाजाला तोरण बांधतात. एका काठीला तेल लावून स्नान केल्यानंतर, केशरी वस्त्र किंवा नवीन साडी बांधतात. कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढतात आणि काठीला कडुळंबाची डाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्याच्या-पितळ्याच्या नाहीतर चांदीचे, कास्याचे भांडे म्हणजेच तांब्याचा गडू, फुलपात्र यापैकी आपल्या घरात असलेल्या उपडे ठेवतात. गुढीच्या ‘ऊं ब्रह्मध्वजाय नमः’ म्हणून पूजा करतात. घरातून उजव्या बाजूला दिसणारी गुढी उभारतात. तयार केलेली गुढी जागेवर/स्थळावर/गॅलरीत ठेवतात. गुढीची काठी नीट बांधतात. काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात. गुढीची पूजा करतात. निरांजन लावतात आणि उदबत्ती दाखवतात. कडुलिंब, डाळ आणि गूळ एकत्र करून त्याचा प्रसाद दाखवतात आणितोच प्रसाद घरातील लहान,मोठयांना प्रसाद म्हणून खायला देतात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी, हळद-कुंकू, फुले वाहून आणि अक्षता टाकून आणि तिला नारळ फोडून ही गुढी उतरवतात. ह्या दिवशी आनंदाने साजरा केलेल्या समयीने नववर्षाचे अभिष्टचिंतन निर्माण होते. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन मराठी पंचांग आणून त्याचे पंचांग वाचन आणि पूजन केले जाते.

गुढीपाडव्याचे महत्त्व:

गुढीपाडवा हा सण धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा दिवस भारतातील विविध प्रांतांमध्ये साजरा केला जातो. या सणाचा महत्त्वाचा इतिहास अनेक पौराणिक कथांमध्ये वर्णित केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी ध्वजाची पूजना करण्यात आली जाते, ज्यानंतर संपूर्ण परिवार सुखसंपन्नतेच्या आशिर्वादांनी सजवलेल्या घरात साजरा करतात. देशभरातही विविध प्रकारे गुढीपाडवा साजरा केला जातो.गुढीपाडवा देशातील काही ठिकाणी वेगळ्या नावाने साजरा केला जातो.

  • गोवा आणि केरळ: गुढी पाडव्याला संवत्सर पडवो म्हणून साजरा केला जातो.
  • कर्नाटक: हा सण युगाडी म्हणून ओळखला जातो.
  • आंध्र प्रदेश आणि तेलंगणा: गुढीपाडवा उगादी म्हणून साजरा केला जातो.
  • काश्मीर: कश्मीरी हिंदू हा दिवस नवरेह म्हणून साजरा करतात.
  • मणिपुर: मणिपूरमध्ये सजिबु नोंगमा पानबा किंवा मेइतेई चेइराओबा म्हणतात.
  • महाराष्ट्र: चैत्र नवरात्रीची सुरुवातही याच दिवशी होते, तो महाराष्ट्रातील लोकांनी गुढी पाडवा म्हणतात.

गुढीपाडव्याचा इतिहास:

शालिवाहन शकास सुरुवात शालिवाहन नावाच्या राजाने शालिवाहन ह्या शकाची सुरुवात अर्थात आरंभ केला त्या दिवशी गुढीपाडवा होता. शालिवाहनाची या शकाची सुरुवात ही महत्त्वाची असून, आजही त्याचे महत्त्व मराठी साम्राज्याच्या इतिहासात असेल. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार करून त्यावर पाणी शिंपडले आणि मातीच्या सैन्यात प्राण भरले. त्यांनी अप्रतिम योद्धांची संख्या तयार केली आणि शत्रूंचा पराभव केला. ह्या विजयाप्रिय संदर्भात, गुढीपाडव्याची सुरुवात असा पवित्र दिवस ठरला.

गुढीपाडव्यात विजयाचे प्रतीक: एक आनंदोत्सवाची सुरुवात

गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक आहे . जेव्हा “श्री राम” लंकेवर विजय मिळवुन अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत गुढी उभारुन मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुध्द प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदाचा दिवस साजरा करतात असेही सांगितले जाते.

गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *