गुजरातचा पूल कोसळला ? चूक कोणाची ? किती तरी निष्पाप लोकांचा जीव गेला . हा अनर्थ टाळता आला असता. नेमका काय चुकलं ?
काय घडलं ?
बुधवारी सकाळी ९ जुलै २०२५ वडोदरा गुजरात वडोदरा येथे असलेला गंभीरा -मुजपूर पूल कोसळला. महिसागर नदी वर असलेला हा पूल आनंद आणि वडोदरा ला जोडत होता. नेहमी प्रमाणे सकाळी पुलावर वहातुक सुरु होती. त्या दिवशी एवढी गर्दी पण न्हवती . अचानक पुलाचा मधला भाग कोसळलं आणि पुलाचे दोन तुकड्यात विभाजन झाले. त्यावेळेस पुलावर असलेले काही गाड्या नदीत पडल्या . घटनेची माहिती मिळताच तिथे NDRF , SDRF आणि अग्निशामक दलाची तुकडी लगेच मदत कार्यासाठी पोहोचले. १० पेक्षा जास्त निष्पाप लोकांचा जीव गेला. तर ६ ते ८ जणांना वाचवण्यात यश आलं.
चूक कोणाची?
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात होणार नवीन रुग्णालयाची उभारणी
१९८१ साली हा पूल बांधण्यात आला होता पण १९८५ पासून हा पूल वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला होता. या पुलामार्गे स्वराष्ट्र मध्ये असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूकीची गर्दी असायची. २०२२ साली येथील राहणाऱ्या काही नागरिकांनी पूल खराब झाल्यामुळे दुरुस्तीसाठी अर्ज केला होता. २०२२ लाच हा पूल प्रमामापेक्षा जास्त हालत होता आणि त्याची डागडुजी करणे गरजेचे होते. प्रशासनाच्या काही लोकांनी येऊन या पुलाची पाहणी केली व थोड्या प्रमाणात डागडुजी करून सोडून देण्यात आले. त्यांच्या निरीक्षणात हे सांगण्यात देखील आला होत कि हा पूल आता वाहतुकीसाठी सुरक्षित नाही. तरीदेखील काहीच पर्याय या पुलासाठी काढला गेला नाही.
नवीन पुलासाठी २१२ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता परंतु २०२२ पासून या पुलाकडे दुर्लक्षच करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी झालेल्या घटनेसाठी शोक व्यक्त करत मृत पावलेल्या लोकांसाठी २ लाख रुपये तर जखमींची ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली आहे. जर वेळीच या पुलाची डागडुजी झाली असती तर किंवा या पुलासाठी काही पर्यायी मार्ग काढला असता तर एव्हडी मोठी दुर्घटना टळली असती. कुठलीच सामिती किंवा कुठलीही मदत जीव गेलेल्या लोकांचा जीव परत आणू शकत नाही.
सीड फंडिंग म्हणजे काय, त्याचे फायदे, अर्ज कसा करावा, आणि पात्रता निकष काय असतात