3 मे 2023 या जागतिक पत्रकारिता स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने Reporter without borders(RSF)तर्फे जागतिक पत्रकारिता स्वतंत्र निर्देशांक 2023 (world press freedom index 2023) प्रकाशित करण्यात आला..!जागतिक पत्रकारिता स्वतंत्र निर्देशांक 2002 या वर्षांपासून हा निर्देशांक प्रत्येक वर्षी प्रकाशित केला जातो. RSF ही एक स्वतंत्र NGO आहे.RSF ही संस्था पॅरिस मध्ये स्थित आहे.
या निर्देशांक मध्ये प्रत्येक देशाच्या सेन्सर हिप, मीडियाची स्वतंत्रता आदी गोष्टी लक्षात ठेवून 180 देशांची रँकिंग ठरवली जाते.
प्रत्येक देशाला 0 -100 असे गुण दिले जातात. त्यामध्ये 100 च्या जवळ गुण ज्यांना मिळालेत त्यांच सर्वात उत्तम कार्य आहे असे विचारात घेतले जाते. ज्या देशाचे गुण 0 च्या जवळ जातात त्या देशाचे कार्य पत्रकारिता मध्ये कमी धरले जाते.
भारत 2023 मध्ये 36.62 गुणांसह 180 देशांच्या यादीत 161 व्या क्रमांकावर आहे.
2022 मध्ये भारताचा क्रमांक 150 वा होता. या वर्षी भारताचे स्थान 11 अंकांनी घसरले आहे.
पत्रकारिता हा आपल्या देशाचाच नाही तर संपूर्ण जगाचा कणा आहे. निर्भीड पत्रकारितेवर समाजाच्या बर्याच गोष्टी अवलंबून असतात. देश विदेशात घडणाऱ्या सर्व घडामोडी तसेच विविध विषय आपल्यापर्यंत पत्रकारांच्या माद्यामातूनच पोहोचतात. समृद्ध भारतासाठी आपला भक्कम पाया असलेली पत्रकारिता मजबूत असणे तितकच गरजेच आहे.
पी एम किसान योजनेपासून आपण वंचित तर नाही ना? १४ व हप्ता तूम्हाला मिळेल का नाही. पहा सविस्तर !
2016 पासून भारताचे क्रमांक सातत्याने घसरत आहे. 2016 मध्ये भारताचे स्थान 133 वर होते..! आपला घसरत असलेला हा क्रमांक आपल्यासाठी खरतर चिंतेची बाब आहे.
कोणते आहेत पाहिले 5 देश
1. नॉर्वे 95.18 गुणांसह 1st क्रमांक वर आहे.
2. आयर्लंड 89.91 गुणांसह 2th क्रमांकवर आहे.
3. डेन्मार्क 89.48 गुणांसह 3rd क्रमांकावर आहे.
4. स्वीडन 88.15 गुणांसह 4th क्रमांकावर आहे.
5.फिनलँड 87.94 गुणांसह 5th क्रमांकावर आहे..
भारताच्या जवळपास असलेले देश
भूतान – 59.25 गुणांसह 90th क्रमांक
श्रीलंका – 45.74 गुणांसह 135th क्रमांक
पाकिस्तान – 39.93 गुणांसह 150th क्रमांक
अफगाणिस्तान – 39.75 गुणांसह 152th क्रमांक.
बांगला देश – 35.75 गुणांसह 163th क्रमांक
समृद्धी महामार्ग एक्स्प्रेस वे वर अपघात का घडला, हि आहेत प्रमुख कारणे
शेवटचे देश
उत्तर कोरिया – 21.72 गुण 180 क्रमांक
चीन – 22.97 गुण 179 क्रमांक
व्हिएतनाम – 24.58 गुण 178 क्रमांक