पिंपरी:
रविवारी पुण्यात जरांगे पाटील यांनी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांनी पत्रकारांसह संवाद साधला. मराठा समाजात खदखद होती. आरक्षण देऊ म्हणाले, पण दिले नाही. शासनाने धोका दिला आहे. त्याला मुख्यमंत्री, गृहमंत्री जबाबदार आहेत. सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढून अंमलबजावणी केली नाही. ५७ लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. मराठा समाजात शंभर टक्के रोष आहे. तो या निवडणूकीत नक्कीच दिसेल. आमचा मार्ग हा राजकीय नाही. आम्हाला आरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही कुठल्या पक्षाला पाठिंबा दिला नाही आणि उमेदवार पण नाही दिला. मराठा समाज हुशार आहे. समाजची निवडणूक हातात घेऊन ज्या पाडायच्या आहे त्याला पाडेल, असं त्यांनी सांगितलं.
“उमेदवार होण्यापेक्षा उमेदवार पाडणारे व्हा”, त्यात मोठा विजय आहे. सगेसोयऱ्यांचा निर्णय घेऊन, त्याच्या बाजूने उभे राहा, अशा प्रकारच्या भूमिकेत मराठा आरक्षण आंदोलनकर्ता मनोज जरांगे पाटील यांनी मांडलं. मराठा समाजाने लोकसभा निवडणूकीत कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. कोणीही समाजाचे, माझे नाव वापरू नये. मराठा समाजात शंभर टक्के रोष असून, तो या निवडणूकीत नक्कीच दिसेल, असं इशारा त्यांनी केला.
गृहमंत्री आणि सरकारच्या अयशस्वीतेचा संघर्ष
सहा जूनपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास विधानसभेला काबीज करणार आहोत. मी गृहमंत्री आणि सरकारच्या एकही डावात यशस्वी झालो नाही. आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे. मला बाजूला करण्यासाठी गृहमंत्र्यांनी अनेक प्रयत्न केले, परंतु मी बाजूला झालो नाही. सध्या महाराष्ट्रात माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. आमिष दाखवून माणसं फोडलं जातं. विनाकारण महिलांवर गुन्हे दाखल केले जातं. हे सर्व सरकारला जड जाईल.ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण द्यावा अशी आमची मागणी आहे. आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेतलं. त्यावर शासनाने अधिसूचना काढली. पण, अंमलबजावणी केली नाही, येथे धोका झाल्याचे त्यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर यांसोबत आमचा संपर्क नाही. परंतु, आमची मने एक आहेत. दोन मन होऊ शकत नाही. कोणाला निवडून आणायचं हे समाज ठरवतं. पण एक लक्षात ठेवा, आई-बहिणीच्या अंगावरील जखमा समाजाने विसरू नये. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, यांनी मराठा समाजाला काही दिलं नाही.