मणिपूर जळतोय..! पण यात चूक कुणाची.

मणिपूर जळतोय..!पण यात चूक कुणाची.
गेल्या ८० दिवसांपेक्षा जास्त दिवस आपण बघतोय कि मणिपूर जळतोय..!पण यात चूक कुणाची, आणि का? याची सुरवात कशी आणि का झाली याची काही करणे आपण पाहू.

मणिपूर मध्ये ३ समुदाय चे लोक वास्तव्य करतात. नागा, कुकी आणि मैथई, पूर्वीपासून मैथई समाज मणिपूर वर राज्य करत होता. तर कुकी आणि नागा समाज आदिवासी समाज म्हणून जगत होता. मणिपूर च्या इंफाल व्हॅली च्या १०% क्षेत्रात ९०% मैथई लोक राहतात तर ९०% क्षेत्रात हे हे १०% कुकी आणि नागा समाज राहतात. जो पूर्ण पने डोंगर दर्यांचा एरिया आहे.

कुकी आणि नागा समाजाला Schedule Tribe (ST) कास्ट चा दर्जा आहे. त्यांना त्यामुळे बऱ्याच गोष्टींमध्ये आरक्षण मिळत. व ते संपूर्ण मणिपूर मध्ये कुठेही जागा खरेदी करू शकतात.

दुसरीकडे मैथई समाजातील लोकांना कसलेच आरक्षण मिळत नाही आणि त्यांना व्हॅली सोडून इतर ठिकाणी म्हणजे डोंगरांमध्ये जागा देखील खरेदी करता येत नाहीत. परंतु सुपीक व शेतीयोग्य जमीन हि व्हॅली मधेच आहे. डोंगराळ भागात फक्त अफू ची शेती कर्ली जाते त्यामुळे सरकार कडून नेहमीच त्यांच्यावर कारवाई केली जाते.

मणिपूर मध्ये ६० विधानसभा सदस्य आहेत त्यापैकी ४० सदस्य हे मैथई समाजाचे आहेत. आता पर्यंत फक्त २ मुख्यमंत्री सोडले तर सर्व मुख्यमंत्री हे मैथई समाजाचे राहिले आहेत.त्यामुळे राजकारणात मैथई समाजाचे नेहमीच वर्चस्व राहिला आहे. त्यामुळे दोन्ही समाज वेगवेगळ्या विचारांचे आणि स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटांमध्ये नेहमी तेढ वादातच राहिली आहे.

कशी केली पुण्यात अतिरेक्यांना अटक. सविस्तर वाचा..!

पण खरी जाळपोळ ला सुरवात कशी झाली.

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम व्ही मरलीधरण यांनी केंद्राला आणि मणिपूर सरकार ला मैथई समाजाला ST कास्ट चा दर्जा देण्यासाठी विचार करण्यात यावा अशी नोटीस दिली. त्यांच्या या वक्तव्यानंतर कुंकू समाजात मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झाला. कारण उच्च न्यायालयाचे हे वक्तव्य मैथई समाजाचं हिताचं आहे आणि कुकी समाजाचा काहीच विचार न करता हा निर्णय दिला आहे असा त्यांना वाटलं.

दुसऱ्याच दिवशी चुराचंदपूर येथे मोठ्या प्रमाणात कुकी समाजातील लोकांनी निदर्शने करण्यास सुरवात केली. त्यांच्या याच निदर्शनाला नंतर हिंसक वळण लागलं व जाळ पोळ ला सुरवात झाली.

त्यानंतर एक फेक विडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये एका मुलीवर कॉलेज मध्ये अत्याचार झाल्याचं सांगण्यात आला होत. हि मुलगी मैथई समाजाची आहे आणि कुकी समाजातील लोकांनी तिच्यावर अत्याचार केला आहे असा त्या विडिओ मध्ये सांगण्यात आला होत. पोलिसांनी जेव्हा हा विडिओ पहिला आणि त्याची पडताळणी केली तेव्हा हा विडिओ जुना असून दुसऱ्या राज्यातील आहे असा सांगण्यात आला. या ठिकाणी फक्त असंतोष पसरवण्यासाठी हा विडिओ बाहेर आल्याचं समोर आला. परंतु नंतर असेच विडिओ बाहेर येऊन आणखी अनर्थ होऊ नये यासाठी सरकारने मणिपूर मधील इंटरनेट सेवा बंद केल्या.

पी एम किसान योजनेपासून आपण वंचित तर नाही ना? १४ व हप्ता तूम्हाला मिळेल का नाही. पहा सविस्तर !

परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.त्यानंतर कुकी समाजातील लोकांनी देखील ३ मे ला २ महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काडली. व त्याच्यातील एका महिलेवर बलात्कार देखील केला. मेथीं समाजातील काही लोकांना ठार देखील मारण्यात आले. ह्या घटनेनंतर दोन्ही गटात प्रचंड आक्रोश निर्माण झाला. व एकमेकांवर अत्याचार व हल्ले करण्यास सुरवात झाली. यांच्या या प्रकारामुळे १०० पेक्षा जास्त लोक बेघर झाले आहेत तर ५० हजार पेक्षा जास्त लोक बेघर झाले आहेत.

मग प्रश्न एकच आहे कि एवढं सगळं ८० दिवसांपेक्षा जास्त दिवस चाललं आहेत तरी सरकार गप्प का?

Insta News Facebook Page

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *