मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा . त्याचे फायदे काय ? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अखेर ३ ऑक्ट ला केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली अशी घोषणा केली. बरेच वर्षांपासून सगळ्याच्या मागणी ला यश आला.
आता पर्यंत किती अभिजात भाषा आहेत?
आता पर्यंत एकूण ११ भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला आहे. सर्वप्रथम तामिळ भाषेला २००४ मध्ये हा दर्जा देण्यात आला. तर २००५ मध्ये संस्कृत. २००८ ला कन्नड आणि तेलगू. २०१३ ला मल्याळम तर २०१४ ला ओडिया भाषेला देण्यात आला. २०२४ ला एकूण ५ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. मराठी , पाली, प्राकृत , असामी व बंगाली अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला.
हाथरस मध्ये शाळेतील मुलाचा नरबळी. काय झाला त्या रात्री ?
अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी लागणारे निकष .
भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किम १५०० ते २००० वर्षे प्राचीन असावा लागतो. भाषा कोणत्या ही भाषेतून उसनी घेतलेली नसावी. ती स्वयंभूषण असावी. सध्याच्या भाषेपासून त्याचे स्वरूप वेगळे असले पाहिजे. त्या भाषेत असलेलं सगळे साहित्य मौल्यवान असले पाहिजे. तसेच महत्तव पूर्ण असले पाहिजे .
एखादा भाषेला दर्जा भेटल्यावर काय बदल होतात ?
त्या भाषेच्या संवर्धनासाठी फायदा होतो. भाषेच्या अभ्यास , साहित्य संग्रह , संशोधन साठी लागणारे सर्व गोष्टींची पूर्तता केली जाते. ग्रंथालय याना शश्क्त करण्यासाठी लागणारी आर्थिक मदत केली जाते. तसेच भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये ती भाष्य शिकवायची सोया केली जाते. तसेच त्या भाषेतील प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. त्या भाषेच्या उत्कर्षांसाठी काम करणाऱ्या संस्था , विद्यार्थी आदींना सर्व प्रकारची मदत केली जाते.
बापदेव घाटात गँग रेप ! काय आहे प्रकरण ?
राज्य सरकारचा निर्णय.
महाराष्ट्र राज्य मंडळाने ३ ऑक्ट हा दिवस यापुढे ‘ मराठी अभिजात भाषा गौरव दिन ‘ म्हणून साजरा करण्याचा निर्णय केला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपल्यला बरेच फायदे होतील.