नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे जमा झालेले कसे पाहणार ?

महाराष्ट्र राज्यातील तब्बल ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता २६ ऑक्टोबर २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे.१७२० कोटी रुपयांचा निधी या योजनेचा पहिल्या हफ्त्यासाठी सरकार कडून शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडण्यात आले आहेत.परंतु काही पात्र शेतकऱ्यांना अजून पैसे मिळाले नाहीत या सर्व शेतकऱ्यांनी हे काम केल्यास त्यांना पैसे मिळणार आहेत पाहूया सविस्तर माहिती.नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे जमा झालेले कसे पाहणार ?

महाराष्ट्र राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठीची सर्वात मोठी योजना नमो शेतकरी महासन्मान योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे.पीएम किसान सन्मान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रु.देण्याची घोषणा केली होती आणि या योजनेसाठी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना नव्याने अर्ज करणे ची आवश्यकता न्हवती ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे मिळतात अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे थेट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

योजनेचे नाव :नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
लाभार्थी संख्या :८५ लाख ६० हजार शेतकरी
लाभ रक्कम :२००० रु.
पहिल्या हफ्ता जमा तारीख :२६ ऑक्टोबर २०२३
वितरीत निधी :१७२० कोटी रु

महाराष्ट्र राज्यातून पीएम किसान सन्मान योजनेसाठी ९३ लाख 20 हजार शेतकरी पात्र असल्याचे सांगण्यात आले आहे परंतु नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता मात्र ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांच्याच खात्यावर जमा करण्यात आला आहे आणि उर्वरित ७ लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हफ्ता मिळाला नाही.उर्वरित शेतकऱ्यांना पैसे का मिळाले नाहीत किंवा कधी मिळणार याबाबत माहिती खाली देण्यात आली आहे.

ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हफ्ता आला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली EKYC पूर्ण करून घेणे आवश्यक आहे तसेच आपल्या जमिनीची माहिती अद्यावत करून आपल्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे का नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे आणि सर्व करून देखील तुम्हाला पैसे आले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच पोस्टात त्यांचे खाते उघडून घेयचे आहे.

विराट कोहली खेळात असताना अम्पायर नी वाईड बॉल का दिला नाही?

पोस्टात खाते ओपन केल्यानंतर ते थेट तुमच्या आधार कार्डला लिंक झालेले असते आणि एवढ केल्यास शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता जमा होणार आहे.

नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे जमा झालेले कसे पाहणार ?

नमो शेतकरी योजनेचा स्टेटस पाहण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.
त्यानंतर तुमचा Registration ID किंवा आधार नंबर टाकून तुम्हाला लॉगीन करायचं आहे.
यानंतर ओपन झालेल्या स्टेटस मध्ये तुम्हाला तुमचे नाव व माहिती पहायची आहे.
खाली आल्यावर ekyc Done : YES
Adhar Bank Link Status : YES
Land Seeding : YES

इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन संघर्ष २०२३- संपूर्ण माहिती

या तिन्ही ठिकाणी YES असल्यास तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता जमा होणार आहे.यामध्ये एकही ठिकाणी जर NO असेल तर मात्र तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता व पीएम किसान योजनेचा देखील पुढील हफ्ता मिळणार नाही.

Follow us

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *