नितीन गडकरींच्या पराभवासाठी भाजपचा पुढाकार : संजय राऊतांच्या आरोपांना मिळला दुजोरा.४ जून रोजी निकाल जाहीर होणार असलात तरी राजकीय वर्तुळत चांगलीच आरोप प्रत्यारोपाची मालिका आपल्या पाह्यला मिळतेय. चार जूनच्या निकालापूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निकालावरून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अनिल देशमुख यांनी गडकरी यांच्या पराभवासाठी भाजपमधून रसद पुरवली गेली, असा गंभीर आरोप केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपुरात पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर आता भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. राऊतांच्या आरोपांवर खंडन करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार अनिल देशमुख यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना दुजोरा दिला आहे.
नितीन गडकरींच्या पराभवासाठी भाजपचा पुढाकार
अनिल देशमुख यांनी सुद्धा गडकरी यांच्या पराभवासाठी भाजपमधून रसद पुरवली गेली, असा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे चार जूनच्या निकालापूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निकालावरून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राऊत यांनी सामनामधून रोखठोक सदरामध्ये केलेल्या आरोपांनंतर देशमुख यांनी सांगितले की, गडकरी यांचा पराभव करण्यासाठी त्यांच्याच पक्षाने मदत केली हे सर्व नागपूरला माहिती आहे. त्यामुळे संजय राऊत जे रोखठोकमधून बोललं आहे ते सर्व खरं आहे. नागपूर लोकसभेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेनं एकत्र काम केलं, पण त्यामध्ये बोनस मिळत असेल तर कोणाला नको? अशी विचारणा त्यांनी केली.
नगरविकास खात्यात पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी..!
संजय राऊतांच म्हणणं काय आहे?
संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे की, गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात.
मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दात टीका केली
दरम्यान, राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. राऊतांचे डोकं तपासावं लागेल, तेवढंच राहिलं असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, 4 जूनला निकाल लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयातच दाखल करावा लागेल.
पुणे कार अपघात. नवीन माहिती आली समोर
जय शिरसाठ यांनीही राऊत यांच्यावर हल्लाबोल केला
दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनीही राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी मूर्खा सारखं स्टेटमेंट केलं आहे. राऊत यांना सांगून पडण्याचा डाव रचण्यात येणार का? नेत्यांच्या स्तरावर असल्या गोष्टी होतं नाहीत. गडकरी 100 टक्के निवडून येतील, असा दावा त्यांनी केला.