ओला ची स्कुटर घेताय बाजारात आता इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होऊ लागल्या आहेत.Ola ही भारतीय बाजारातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर आहे. परंतु जर तुम्ही ओला ची स्कुटर घेताय तर एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसेल.
आता महाग ई-स्कूटरची रेंजही जास्त असते. परंतु या स्कूटरच्या बॅटरीची किंमत तुमचा संभ्रम दूर करे. कारण जर तुम्ही बॅटरीच्या किंमती जाणून घेतल्यानंतर, तुम्ही स्कुटर खरेदी करण्याचा प्लॅन बदलू शकता. किमतीचा विचार केला तर या बॅटरीची किंमत स्कूटरच्या एक्स-शोरूम किंमतीच्या निम्म्यापेक्षा कमी आहे.
किती आहे किंमत?
ओलाने अजूनही त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतींबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही. अशातच आता कंपनी स्कूटरच्या बॅटरी आणि मोटरवर ३ वर्षांची वॉरंटी देत असून कंपनी स्वतः 3 वर्षापूर्वी बॅटरी बदलून देऊ शकते. परंतु सोशल मीडियावर बॅटरीच्या किमती उघड झाल्या आहेत. किमतींबद्दल बोलायचे झाले तर लेव्हलनुसार, स्कूटरमध्ये वापरलेल्या 3 kWh बॅटरी पॅकची किंमत 66,549 रुपये इतकी आहे. तर 4 kWh बॅटरी पॅकची किंमत 87,298 रुपये इतकी आहे.
अजित दादा पुण्याचे पालकमंत्री तर चंद्रकांत दादा सोलापूर चे पालकमंत्री..!
डिझाइन
कंपनीने S1 सीरिजमध्ये एअरचे नवीन मॉडेलचा समावेश केला असून ही कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. इतकेच नाही तर कंपनीने या स्वस्त मॉडेलमध्ये मोठा बदल केला आहे. त्यामुळे ग्राहकांची बचत होणार आहे. तसेच मागच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेतही सुधारणा केली आहे. कंपनी आपल्या स्कूटरमधील मागच्या प्रवाशासाठी सीटजवळ सपोर्टिंग अँगल देण्यात आले आहे. परंतु या कंपनीने S1 Air मधील ही कमतरता दूर केली असून कंपनीने फ्रंटला फ्लॅट फूटरेस्टही दिला आहे.
विवाहित मुलीलाही मिळू शकते आई-वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर नोकरी – उच्च न्यायालय
तसेच Ola S1 Air मध्ये, सीटसोबत सपोर्टिंग अँगल देण्यात आला आहे. इतकेच नाही तर Ola S1 Pro आणि S1 मध्ये ग्राहकांना बॅक रेस्ट वेगळे इन्स्टॉल करावे लागणार आहे. ज्याची किंमत सुमारे 500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त होती. म्हणजेच आता त्यांना ही रक्कम खर्च करावी लागणार नाही.