होय तुमच्या फळपिकाला मिळतो विमा. मग आपण मागे का राहायचं. आजच आपल्या फळपिकाचा विमा करून घ्या. जाणून घ्या अधिक माहिती..!
शेतकरी राज्याच्या जीवावर अक्खी जनता जगते. मग तो गरीब असो श्रीमंत असो व गर्भश्रीमंत असो. शेतकरी राजाच साऱ्या पोशिंदा आहे हे आपल्या सर्वांना माहित आहेच. वर्षभर मेहनत घ्यायची, रात्रंदिवस काबाड कष्ट करून पीक उभी करायची आणि त्या पिकाचं फळ घायची वेळ अली कि शेतकऱ्यांना कित्येक विगन येतात हे आपण जाणतोच. मग तो अवकाळी पाऊस असेल, वादळी वारे असेल किंवा इतर कटीतही संकट शेतकऱ्यांवर धावून येत असतात. कधी कधी यातील काहीच झालं नाही तर पिकाला भावाचं येत नाही.
म्हणजे एकूण काय तर फक्त शेतकऱ्यांवर ते पीक जाईपर्यंत फक्त टांगती तलवारच असते. असो आपण बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहित नाही कि आपण या संकटाना तोंड देण्यासाठी केंद्र करकर कडून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक बिमा योजना सुरवात करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यातील फळबागांना हवामान आधारित बिमा योजना लागू करण्यात आली आहे. त्यामधील खरीप फळ पीक योजनेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज कारण्याचीप्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे.
आपल्या देशात फळपिकांचा उत्पन्न वाढीमध्ये मोठा वाट आहे. त्यातून शेतकऱ्यांची प्रगती होते. म्हणूनच हवामान , नैसर्गिक आपत्ती आणि अवकाळी पाऊस यापासून शेतकऱ्यांच्या पिकांना विमा संरक्षण मिळण्यासाठी हि योजना सुरु करण्यात अली आहे. यामध्ये संत्रा,मोसंबी, चिक्कू , डाळिंब , पेरू , द्राक्ष, सीताफळ , लिंबू इत्यादी फळपिकांचा समावेश आहे.
फळपीक विमा योजनेचे मुख्य उद्धीष्ट्य.
शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या काही प्रमाणात आर्थिक मदत मिळावी.
नैसर्गिक आपत्ती तसेच वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या फळपिकांचे नुकसान झाले तर त्याना विमा संरक्षण मिळावे.
शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानयुक्त शेती करण्यास प्रोत्साहन द्यावे.
तसेच नुकसान झाले तर शेतकऱ्यांनी निरास व हतबल न होयला स्थैर्य राखावे.
अर्ज कुठे आणि कसा करावा
फळ पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज कारण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या जवळील सी.एस.सी सेंटर, बँक, प्राथमिक कृषी पतपुरवठा सरकारी संस्था, अथवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी भेट द्यावी लागेल. तिथे जाऊन हा अर्ज ओनलाईन पद्धतीने भरायचा आहे.