पी एम किसान योजनेपासून आपण वंचित तर नाही ना? केंद्र शासनाच्या वतीने शेतकर्याना त्यांच्या सन्मानार्थ पी एम किसान योजनेअंतर्गत आर्थिक लाभ देण्यात येत होता. शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी पी एम किसान योजना सुरु करण्यात आली आहे.पण आपण पी एम किसान योजनेपासून आपण वंचित तर नाही ना ?
ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना असून दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी योजनेपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकरी कुटुंबांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ मिळतो. पण एका शेतकरी कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र राहतो.
ही योजना देशभरात विशेष लोकप्रिय बनली आहे. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील देखील लाखो शेतकऱ्यांना मिळत आहेत. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 13 हप्ते पात्र लाभार्थ्यांना मिळाले आहेत. दरम्यान चौदावा हप्ता देखील पात्र लोकांना लवकरात लवकर वितरित केला जाणार आहे.
ही योजना वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली नसून शेतकरी कुटुंबांसाठी सुरू झाली आहे. दरम्यान, या योजनेअंतर्गत दिले जाणारे वार्षिक सहा हजार रुपये हे एकूण तीन टप्प्यात पात्र कुटुंबांना मिळतात. अर्थातच दर चार महिन्यांनी दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना लाभ दिला जातो.
केंद्र शासनाच्या माध्यमातून 14 वा हप्ता पात्र शेतकरी कुटुंबांना केव्हा मिळणार याबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. मात्र दर चार महिन्यांनी या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळतो. यामुळे आता हा 14 वा हप्ता जुलै महिन्यातच लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार होणार.पण आमचं काय ? पहा कुणाला कुणाला पडलाय हा प्रश्न ?
कृषी विभागातील सूत्रांनी पुढील हप्ता हा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. अशातच मात्र या योजनेसंदर्भात पुणे जिल्ह्यातून एक महत्त्वाची आणि अतिशय धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात पीएम किसान योजनेसाठी ४ लाख ५५ हजार ४२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी ३ लाख ८९ हजार ८७१ जणांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र ६५ हजार ५५३ असे आहेत ज्यांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही.
यामुळे यांना येत्या चौदाव्या हफ्त्यापासून वंचित रहावे लागू शकतेअसे सांगितले जात आहे. दरम्यान या लोकांना जर पुढील हप्ता हवा असेल तर त्यांनी लवकरात लवकर केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन संबंधितांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात तलाठी भरती निघाली..! पहा तुमच्या जिल्ह्यात किती आहेत जागा.