पुणे महानगर संचालित माध्यमिक , उच्च माध्यमिक आणि रात्र प्रशाला या विनाअनुदानित शाळांमध्ये २०२३-२४ करिता तात्पुरत्या स्वरूपात एकवट मानधनावर करार पद्धतीने सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी रिक्त पदावर निवड प्रक्रिया सुरु करण्यात अली आहे. परीक्षेचे गुण, टी ई टी , सी टी ई टी चाचणीच्या गुणानुक्रमे निवड प्रक्रिया होईल.
खाली दिलेल्या शैक्षणिक अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारास विहित नमुन्यात वयक्तिक माहितीचा अर्ज तसेच प्रमाणपत्र व गुणपत्राच्या छायांकित प्रति जोडून शिक्षणाधिकारी कार्यालय पुणे महानगर पालिका, शिवाजीनगर येथे सकाळी ११ ते ०२ या वेळेत स्वीकारले जानार आहेत.
अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण अति व शर्ती..!
सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी कमाल वयोमर्यादा – ४० वर्षे
मागासवर्गीय वर्गासाठी कमाल वयोमर्यादा – ४५ वर्षे
अपंगासाठी कमाल वयोमर्यादा – ४५ वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांनी अर्जासोबत जातीचा दाखल जोडणे अनिवार्य आहे.
महिला विवाहित असल्यास विवाह प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.
मानधन
माध्यमिक शिक्षक यांना दरमहा मानधन रु १७,५००/-
उच्च माध्यमिक शिक्षकास दरमहा मानधन रु १८,५००/-
रात्रशाळेतील अर्धवेळ शिक्षकास दरमहा मानधन ८,७५०/-
अर्जदाराने प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
विहित मुदतीनंतर आलेले आणि अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही.
टपालाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
महाराष्ट्र शासनाच्या ध्येय धोरणानुसार नेमणूक कालवधी मध्ये बदल होऊ शकतो.
उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह सक्षम उपस्थित राहून अर्ज सादर करावा..
Nice information