कशी केली पुण्यात अतिरेक्यांना अटक. सविस्तर वाचा..!
तारीख १८ जुलै, नेहमी प्रमाणे पोलिसांचं पथक गस्त घालत होते. पहाटे २. ४५ च्या सुमारास कोथरुन मधल्या बढाई चौकात पोलिसांच्या एका पथकाला ३ तरुण संशयास्पद आढळले हे तिघे एका ऍक्टिवा गाडीच्या जवळ उभे होते. पोलीस पथकातील पोलीस ऑसिसर, बिट मार्शल अमोल नझम आणि प्रदीप चव्हाण यांनी त्या तरुणांना विचारपूर केली कि ते इथे एवढ्या रात्री काय करत आहेत.
अशी विचारणा करताच ते तिघेही घाबरले. त्यामुळे पोलिसांनी अधिक माहिती विचारायला सुरवात केली. त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये पोलिसांना कसलाच तथ्य वाटत न्हवत, त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावरील संशय अधिकच वाढला. व त्यांनी त्यांची झडती घेण्यास सुरवात केली. त्यावेळी त्यांच्याकडे एक चवीचा गुच्छ, व चोरी करण्यास लागणार साहित्य आढळलं.
पोलिसाना अस वाटलं कि गाडी चोरी करायला आलेले तरुण आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं व कुठे राहता, काय करता अशी अधिक माहिती विचारण्यास सुरवात केली. होम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, शाहनवाज आलम अशी या तीन तरुणांची नवे आहेत.
कुठे होते राहायला
अधिक माहिती घेतल्यानंतर हे तिघे कोंढव्यात मीठा नगर येथे राहत असल्याचं समोर आला. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन तपस करण्याचं ठरवलं आणि त्यांना घेऊन घरी निघाले, त्यांच्या घरी जात असताना त्यांच्यातील एक जण शाहनवाज आलम पोलिसांना चकमा देऊन फरार झाला. हे तिघेही ग्राफिक designer असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होत. परंतु यांच्या घरातील झडती घेतल्यानंतर पोलिसांना त्यांच्या घरात १ जिवंत काडतूस , ४ मोबाइल, १ लॅपटॉप, पिस्तूल कव्हर, बनावट आधार कार्ड, पांढऱ्या रंगाच्या गोळ्या, इलेकट्रीक वजन काटा, ड्रोन चा साहित्य आढळलं. त्यांच्या लॅपटॉप मधील डेटा चेक केल्यानंतर त्यामध्ये पोलिसांना उर्दू भाषेतील फाईल्स सापडल्या. ज्या फाईल ट्रान्सलेट करून घेतल्या असता अगदी धक्कादायक बातमी सामोर आली ती म्हणजे ह्या फाईल्स मध्ये ब्रेन वॉश करण्यासाठी वापरले जाणारे लिटरेचर होत.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ..! कधी पासून होणार लागू
कोण आहेत हे दहशतवादी.
मार्च २०२२ चितोडगड राजस्थान मध्ये पोलिसांनी तिघांना अटक केली होती कारण त्यांच्याकडे बॉम्ब बनविण्याचे साहित्य सापडले होते. त्यांचा जयपूर मध्ये घातपात करण्याच्या कात होता. पण त्यांचे तीन साथीदार फरार झाले, होते हेच ते तिघे.
तेव्हापासून NIA या तिघांच्या शोधात होती,त्यांच्यावर प्रत्येकी ५ लाखाचे इमरान खान आणि मोहम्मद युनूस हे मूळचे मध्य प्रदेशाच्या रतलामचे रहिवासी आहेत. २०१२ ला रतलाम मध्ये सुफा नावाची एक आतंकवादी संघटना उदयास आली. त्या संघटनेचे हे सदस्य आहे. हि संघटना इसिस साठी स्लीपर सेल च एकं करते.
या संघटनेचे किती सदस्य आहेत हे अद्याप कुणालाच माहित नाही. कारण दिवसेंदिवस यांची संख्या वाढत चालली आहे.
सदाशिव पेठेतील घटना का घडली? म्हणून त्याने केला कोयत्याने वार…!
सुफा संघटनेच्या आतंकवादी कारवाया.
मध्यप्रदेश मध्ये झालेले राजकीय नेत्यांचे खुन, जयपूर साखळी बॉम्ब स्फोट, पुन्हा जयपूर मध्ये पुन्हा घातपात करण्याचा कट यामध्ये सुफा संघटनेचा हात असल्याचं निदर्शनास आले आहे.एवढ्या गुन्हेगारी मध्ये हात असलेले मोठे आतंकवादी पुण्यात दीड वर्षे लपून होते परंतु कुणालाच त्यांचा थांगपत्ता न्हवता.
नागरिकांनी घ्यायची काळजी.
त्यामुळे नक्कीच नागरिकांनी सतर्क असं गरजेचं आहे. आपल्या आसपास कोण राहत आहे आणि त्यांच्या कडून काही संशयास्पद वागणूक होत असल्यास लगेच पोलीस यंत्रणेला त्यांची माहिती देणं गरजेच आहे.