तुमचं रेशन कार्ड रद्द तर झालं नाही ना..! १. २७ लाख रेशन कार्ड रद्द. आजच पहा नक्की काय आहे प्रकार..!
आपल्या भारत सरकारच्या पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड कुटुंबांना ठरविक शिधा हा निश्चित केलेला आहे. परंतु काही कुटुंबाबतील सदस्यांनी एकापेक्षा अधिक रेशन कार्ड काडून घेतली असल्याने त्यांना अधिक प्रमाणात शिधा पुरवला जातात आहे.
तसेच अंत्योदय रेशन कार्ड लाभार्थी असलेल्या कुटुंबाला ३५ किलो तांदूळ मिळायचे परंतु एकाच कुटुंबातील सदस्यांनी एकापेक्षा अधिक रेशन कार्ड काडून घेतली असल्याने त्यांना ७० ते १०० किलो तांदूळ पुरवलं जात आहे.
यामुळे शासनावर अतिरिक्त ताण वाढून गरजवंतांना रेशन पासून वंचित राहावे लगत आहे.
रेशन कार्ड चा लाभ अधिकाधिक गरजवंतांना मिळण्यासाठी शाशनाने हि मोहीम हाती घेतली आहे.
महाराष्ट्र राज्यात मे अखेर २ लक्ष ३२ हजार ७६६ रेशन कार्ड डुप्लिकेट आढळलेले असून छाननी नंतर यातील १ लाख २७ हजार कार्ड रद्द केली जाणार आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक डुप्लिकेट कार्ड नागपूर जिल्ह्यात आहेत तर सर्वात कमी डुप्लिकेट परभणी जिल्ह्यात आहेत.
वन नेशन वन रेशन या योजनेअंतर्गत आता प्रत्येक कुटुंबाला एकाच रेशन कार्ड मिळेल.