सदाशिव पेठेतील घटना का घडली? म्हणून त्याने केला कोयत्याने वार…!

आजकाल मुलांची मानसिकता चाललीय कुठे हे कळायला मार्ग नाही. एखाद्यचा जीव घेणं एवढ सोप्प झालं आहे का? यावर थोडा जरी विचार केला तर लक्षात येईल की सदाशिव पेठेतील घटना का घडली? आपण थोडीशी काही गोष्टीकडे लक्ष दिलं तर सदाशिव पेठेतील घटना परत घडणार नाही.

आजकालच्या पिढीतील तरुनाना आपण पाहतो फेसबुक ,इंस्टा आणि त्यांच्या सोशल अकाउंट मधून त्यांना घरच्यांना बोलायला देखील वेळ नाहीये. त्यांच्या सोशल जगात ते इतके हरवून जातात की याच्या व्यतिरिक्त पण जग आहे याचा विसर यांना पडतोय.

मंत्रिमंडळाचा विस्तार होणार.पण आमचं काय ? पहा कुणाला कुणाला पडलाय हा प्रश्न ?

एवढ सगळं सांगायचं उद्धेश आहे की या सर्वाचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होत आहे.मोबाइल सोडून मैदानी खेळ कमी झालेत त्यामुळे मित्र मैत्रिणी देखील कमीच असतात आजकाल..!त्यामुळे त्यांची मानसिकता कशी आहे आणि त्यांच्या मनात काय चाललंय हे फक्त त्यांचं त्यांनाच माहीत असता. परिणामी कुठलाही निर्णय घेताना ते स्वतः घेतात मग तो चुकीचा आहे की योग्य याचा पण ते कधी कधी विचार करत नाहीत.

आपण पहातोय मागील महिन्यात असे बरेच किस्से झाले जिथे आपल्याच जवळच्या लोकांनी घात करून मर्डर केल्याच्या घटना आपण पहिल्या. त्यामध्ये खरच त्या मुलींची तेवडी चूक होती का की तिचा मर्डर करणंच यांना योग्य वाटलं.

आजकालच्या तरुणांची मानसिकता चाललीय तरी कुठ ?

आता पुण्यातीलच घटना घ्या ना ती मुलगी त्याला प्रेम संबध ठेवायला नकार देत होती.. वारंवार नाही म्हणत असताना देखील तो मुलगा तिला त्रास देतच होता. ती मला नकार देते याचाच राग मनात धरून त्या मुलाने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. एवढ्या खालच्या पातळीवर यांचे विचार एवढ्या छोट्याश्या कारणासाठी जातात तरी कसे. नक्कीच आशा तरुणांवर कठोर मधली कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि ही कारवाई इतकी कठोर असावी की दुसऱ्या कुणाची अशी कृती करायची परत टाकत नाही झाली पाहिजे..!

पालकांसाठी सूचना
आजकाल आपण सर्वांना फ्रीडम दिला पाहिजे पण आपण खुच जास्त फ्रीडम आपल्या मुलांना देत नाही ना याकडे पालकांचं नेहमी लक्ष असायला पाहिजे.
आपली मुलगी, मुलगा कुणाशी बोलते.तिचे फ्रेंड सर्कल मध्ये कोण कोण आहे याची थोडीफार माहिती पालकांनी ठेवायला हरकत नाही.
आपल्या मुलाच्या वागण्याकडे पालकांचे बारीक लक्ष असावे.
मुलांच्या वागण्यात फरक पडत असेल तर त्याच्या विश्वासात घेऊन पालकांनी चर्चा करायला पाहिजे.
अगदीच नाही पण थोड्या फार प्रमाणात मुलांवर लक्ष असणं गरजेचं आहे.

शिक्षण घेतलय पण जॉब नाही?

जेणेकरून अश्या घटनांना आपण कमी करू शकू.
आशा नवनवीन अपडेट रोज मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा

इंस्टा न्यूज फेसबुक पेज

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *