शहरी-गरीब योजनेतून आपल्याला मिळू शकते १ लाख ते २ लाखापर्यंत वैद्यकीय मदत.अटी व शर्तींसाठी अधिक माहिती वाचा.

urban poor scheme

शहरी-गरीब योजनेतून आपल्याला मिळू शकते १ लाख ते २ लाखापर्यंत वैद्यकीय मदत.अटी व शर्तींसाठी अधिक माहिती वाचा.

शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना ही पुणे म.न.पा. कार्यक्षेत्रातील झोपडपट्टयांमध्ये राहत असलेल्या, दारिद्रयरेषेखालील पिवळे रेशनकार्ड व कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न र. रु. एक लाखापर्यंत असणार्‍या गरीब कुटूंबियांसाठी लागू करण्यात आलेली आहे.
पुणे मनपा तर्फे एका कुटूंबासाठी एका वर्षासाठी जास्तीत जास्त एक लाख रुपये इतका खर्च करण्यात येतो. (मा. महापालिका सभा ठराव क्र. ४१, दि. २१/०५/२०१८ अन्वये शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत पॅनेलवरील प्रायव्हेट हॉस्पीटल मधील अर्तरुग्ण विभागातील वैद्यकीय उपचारांसाठी सी.जी.एस.एस. मान्य दराने ५०% हमीपत्रांतर्गत किडनी, हृदयरोग व कॅन्सर या तीन आजारांसाठी रक्‍कम रुपये १,००,०००/- (अक्षरी रक्कम रुपये एक लाख) या कमाल मर्यादेखजी रक्कम रुपये २,००,०००/- (अक्षरी रक्‍कम रुपये दोन लाख) या कमाल मर्यादेपर्यंत आर्थिक लाभ देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

कोण होऊ शकेल लाभार्थी?
सदर योजनेचे सभासद होण्यासाठी मनपा झोपडपट्टीत राहत असल्याचे ओळखपत्र किंवा ग.व.नि. विभागाचे सेवाशुल्क भरलेली पावती किंवा दारिद्रय रेषेखालील असलेचे रेशनकार्ड पुरावा व वरील व्यतिरिक्त पुणे मनपाच्या कार्यक्षेत्रात राहत असलेल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. एक लाखपर्यंत असलेला मा. तहसीलदार, पुणे यांचा दाखला, रेशनींग कार्ड, अपत्यांचे जन्माचे दाखले, कुटूंबाचे पात्र सभासदांचे एकत्रित दोन फोटो इ. आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. प्रत्येक वर्षी कुटूंबास नोंदणी फी रु.१००/- व वार्षीक शुल्क रु.१००/- असे एकूण रु.२००/- रोख शुल्क आकारण्यात येते. तसेच कुटूंब म्हणे पती, पत्नी, आई, वडील व २५ वर्षाखालील पहिले दोन अपत्य (विवाह झाल्यास अपत्याचे सभासदत्व रदद करण्यात येईल.)तिसरे मुल १ जानेवारी, २००५ पूर्वी जन्मल्यास त्यास सभासदत्व देण्यात येईल. कुटूंबातील या योजनेच्या कार्डमध्ये नोंद असणा-या सभासदांना या योजनेचा लाभ घेणे शक्‍य होईल. या मर्यादेपेक्षा जास्त होणारा खर्च संबंधित रुग्णाने भणणे आवश्यक आहे.

कोणासाठी हि योजना लागू होईल ?

शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना ही पुणे म.न.पा. कार्यक्षेत्रातील झोपडपट्टयांमध्ये राहत असलेल्या, दारिद्रयरेषेखालील पिवळे रेशनकार्ड व कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न र. रु. एक लाखापर्यंत असणार्‍या गरीब कुटूंबियांसाठी लागू करण्यात आलेली आहे. पुणे मनपा तर्फे एका कुटूंबासाठी एका वर्षासाठी जास्तीत जास्त एक लाख रुपये इतका खर्च करण्यात येतो. (मा. महापालिका सभा ठराव क्र. ४१, दि. २१/०५/२०१८ अन्वये शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत पॅनेलवरील प्रायव्हेट हॉस्पीटल मधील अर्तरुग्ण विभागातील वैद्यकीय उपचारांसाठी सी.जी.एस.एस. मान्य दराने ५०% हमीपत्रांतर्गत किडनी, हृदयरोग व कॅन्सर या तीन आजारांसाठी रक्‍कम रुपये १,००,०००/- (अक्षरी रक्कम रुपये एक लाख) या कमाल मर्यादेखजी रक्कम रुपये २,००,०००/- (अक्षरी रक्‍कम रुपये दोन लाख) या कमाल मर्यादेपर्यंत आर्थिक लाभ देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर ठरावाचे कार्यवाहीचे अनुषंगाने मा. महापालिका आयुक्‍त ठराव क्र. ६/१८९, दि.३०/०७/२०१८ अन्वये नियमानुसार योजनेअंतर्गत समाविष्ट कुटूंब सदस्यांना, किडनीविकार, हृदयरोग आणि सर्व प्रकारचे कॅन्सर (कर्करोग) रक्‍कम रुपये २,००,०००/- (अक्षरी रक्‍कम रुपये दोन लाख) या कमाल मर्यादेपर्यंत, जनरल वॉर्डच्या सी.जी.एच.एस. मान्य दराने ५०% किंवा १००% हमीपत्रांतर्गत लाभ देणेचे कार्यवाहीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे.) सदर योजना ही दरवर्षी दि.१ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीसाठी लागू आहे. सदर योजनेचे सभासद होण्यासाठी मनपा झोपडपट्टीत राहत असल्याचे ओळखपत्र किंवा ग.व.नि. विभागाचे सेवाशुल्क भरलेली पावती किंवा दारिद्रय रेषेखालील असलेचे रेशनकार्ड पुरावा व वरील व्यतिरिक्त पुणे मनपाच्या कार्यक्षेत्रात राहत असलेल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. एक लाखपर्यंत असलेला मा. तहसीलदार, पुणे यांचा दाखला, रेशनींग कार्ड, अपत्यांचे जन्माचे दाखले, कुटूंबाचे पात्र सभासदांचे एकत्रित दोन फोटो इ. आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. प्रत्येक वर्षी कुटूंबास नोंदणी फी रु.१००/- व वार्षीक शुल्क रु.१००/- असे एकूण रु.२००/- रोख शुल्क आकारण्यात येते. तसेच कुटूंब म्हणे पती, पत्नी, आई, वडील व २५ वर्षाखालील पहिले दोन अपत्य (विवाह झाल्यास अपत्याचे सभासदत्व रदद करण्यात येईल.)तिसरे मुल १ जानेवारी, २००५ पूर्वी जन्मल्यास त्यास सभासदत्व देण्यात येईल. कुटूंबातील या योजनेच्या कार्डमध्ये नोंद असणा-या सभासदांना या योजनेचा लाभ घेणे शक्‍य होईल. या मर्यादेपेक्षा जास्त होणारा खर्च संबंधित रुग्णाने भणणे आवश्यक आहे.

अंमलबजावणी कालावधी

दरवर्षी ही योजना १ एप्रिल ते ३१ मार्च या एक वर्षाच्या कालावधीसाठी लागू राहील.

५ वार्षिक वर्गणी 

प्रत्येक वर्षी कुटूंबास नोंदणी फी रु.१००/- व वार्षिक रु.१००/- अशी एकूण र. रु: २००/- रोख शुल्क आकारण्यात येणार आहे.

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे –

१) म.न.पा. झोपडपट्टीत राहत असल्याचे ओळखपत्र किंवा २०२० नंतरची किंवा चालू वर्षाची गवणी पावती/सेवाशुल्क पावती किंवा दारिद्रय रेषेखालील असलेले रेशनकार्ड पूरावा व वरील व्यतिरिक्त पुणे म.न.पा.च्या कार्यक्षेत्रात राहत असलेल्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. एक लाख पर्यंत असलेला मा. तहसीलदार, पुणे यांचा दाखला

२) रेशनकार्ड

३) अपत्यांचे जन्माचे दाखले

४) कुटूंबाचे पात्र सभासदांचे एकत्रित दोन फोटो (व्हिजिटिंग कार्ड मापाचे)

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *