शिक्षण घेतलय पण जॉब नाही? या लेखात आम्ही तुमच्यासाठी अशी माहिती घेऊन आलो आहोत ज्यातून तुम्ही घरी बसून काम करून हजारो रुपये कमवू शकता.
शिक्षण घेतलय पण जॉब नाही? या लेखात आम्ही तुमच्यासाठी अशी माहिती घेऊन आलो आहोत ज्यातून तुम्ही घरी बसून काम करून हजारो रुपये कमवू शकता.
मित्रानो आजकाल शिक्षण घेऊन देखील बऱ्याच वेळा लवकर नोकरी भेटत नाही. कधी कधी नोकरी भेटली तरी वेगळ्या शहरात असते आणि आपल्याला तिथे जाऊन काम करणे शक्य नसते.काही लोकांवर कुटुंबाची जबाबदारी असते त्यामुळे त्यांना घर सोडून जाता येत नाही. अशी एक ना अनेक करणे आहेत ज्यामुळे नोकरी मिळत नाही. आणि काही काळ निघून गेल्यानंतर करियर मध्ये गॅप पडल्यामुळे देखील आपल्याला नोकरी मिळणे मुश्किल होऊन जात.
मग अश्या वेळी काय काय करायचं. बऱ्याच वेळा खूप जास्त शिक्षण घेतलेलं असता त्यामुळे शेतातील काम देखील करायला जमत नाहीत. पण अश्यावेळी हारून न जाता काही ऑनलाईन करण्यासारखं काम आहे का बघून ते तुम्ही करू शकता.
मग आता यामध्ये पण ऑनलाईन गोष्टींवर विश्वास कसा ठेवायचा हे मुश्किलच. कारण आपण पाहतो नेहमी कुठे ना कुठे ऑनलाईन फ्रॉड होत असतात. आपण त्यामध्ये तर नाही ना अडकणार याची भीती देखील असतेच. आधीच नोकरी नसल्यामुळे निराशा आन त्यात अजून असा काय झालं तर दुष्काळात तेरावा महिना व्हायचा. म्हणून ऑनलाईन काम करताना आपण कुणासोबत काम करतोय किंवा कुठल्या वेबसाईट वर काम करतोय ती किती ट्रस्टेड आहे हे पाहून देखील गरजेचं आहेच.
कुठंतरी जास्त पैशांच्या लालसेपोटी फ्रॉड वेबसाईट वर अजिबात काम करू नका.
आजही मार्केट मध्ये काही प्रामाणिक वेबसाईट आहेत ज्यावर काम करून पण चांगल्या प्रकारे आर्थिक कामे करू शकता त्यापैकी काही वेब साईट बद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत.
१. www.upwork.com:
अपवर्क हा सर्वात मोठा फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण लेखन, ग्राफिक डिझाइन, प्रोग्रामिंग, विपणन आणि बरेच काही यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये रिमोट वर्क शोधू शकता.
२. www.freelancer.com:
फ्रीलान्सर हे आणखी एक लोकप्रिय व्यासपीठ आहे जिथे आपण घरून फ्रीलान्स वर्क शोधू शकता. इथे तुमच्या क्षमतेनुसार प्रति तास प्रमाणे देखील आपल्याला इथे पैसे मिळू शकतात.
३. www.fiverr.com:
फाइव्हर एक मार्केटप्लेस आहे जिथे फ्रीलान्सर्स लेखन, ग्राफिक डिझाइन, व्हिडिओ एडिटिंग, प्रोग्रामिंग आणि बरेच काही यासारख्या वेगवेगळ्या श्रेणींमध्ये त्यांची सेवा देऊ शकतात. क्लायंट थेट ब्राउझ करू शकतात आणि फ्रीलान्सर भाड्याने घेऊ शकतात.
४. www.remote.co:
हि वेबसाइट आहे जी नोकरीच्या संधींची यादी करण्यात माहिर आहे. यात विविध क्षेत्रात रिमोट पोझिशन देणाऱ्या विविध कंपन्यांचा समावेश आहे.
५. www.flexjobs.com:
फ्लेक्सजॉब्स एक जॉब बोर्ड आहे जो लवचिक आणि दूरस्थ कामाच्या संधींवर लक्ष केंद्रित करतो. यात नामांकित कंपन्यांच्या रिमोट जॉब्सची क्यूरेटेड यादी देण्यात आली आहे.
या वेबसाईट वर आपण काम करून महिन्याला हजारो रुपये घरी बसून कमावू शकता.
पण एक लक्षात ठेवा मित्रानो ऑनलाईन काम करत असताना प्रत्येक वेळी त्या वेबसाईट ची आणि कामाची पडताळणी करुंसाच काम सुरु करा. स्वतःची वयक्तिक माहिती शेअर करण्यापूर्वी सर्व गोष्टी पडताळूनच काम सुरवात करा.
तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा…!