श्रावण बाळ सेवा योजना : निराधार वृद्धांना मिळणार आर्थिक आधार. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत ‘श्रवण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना’ राबविण्यात येत असून राज्यातील निराधार वृद्धांना आधार देणारी ही महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत किमान ६५ वर्षांवरील आणि किमान १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या वृद्ध व्यक्तींना दरमहा रु. १५००/- निवृत्तीवेतन आर्थिक मदत म्हणून दिली जाते. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न २१,००० रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी वयाचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते. अर्ज तहसील कार्यालय, सेतु केंद्र तसेच आपले सरकार पोर्टल वरून ऑनलाईन करता येतो. शासनाची ही योजना वृद्धांना आर्थिक दिलासा देऊन त्यांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.श्रावण बाळ सेवा योजना : निराधार वृद्धांना मिळणार आर्थिक आधार
संजय गांधी निराधार अनुदान योजना : गरजूंसाठी आधार
◼️ लाभार्थी कोण?
किमान ६५ वर्षांवरील निराधार वृद्ध व्यक्ती या योजनेस पात्र आहेत.
संबंधित वृद्ध व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला ₹२१,०००/- पेक्षा कमी असावा.
बीपीएल कुटुंब नसलेल्या वृद्धांना प्राधान्य दिले जाते.
◼️ आवश्यक कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्ज
वयाचा दाखला (किमान ६५ वर्षे पूर्ण झाल्याचा पुरावा)
किमान १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्यास असल्याचा दाखला
उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न मर्यादा रु. २१,०००/-)
आधार कार्ड, रेशनकार्ड, निवासाचा पुरावा, ओळखपत्र
बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला
अर्जदाराचा फोटो इत्यादी
◼️ लाभ
अर्ज मंजूर झाल्यावर पात्र वृद्ध व्यक्तींना दरमहा रु. १५००/- निवृत्तीवेतन म्हणून देण्यात येते.
या माध्यमातून समाजातील निराधार, गरजू वृद्धांना जीवन जगण्यासाठी आवश्यक किमान आर्थिक आधार उपलब्ध होतो.
३० दिवस तुरुंगात, पद गमावणार मुख्यमंत्री? संसदेत नव्या विधेयकांवर गदारोळ.
◼️ अर्ज कुठे करावा?
तहसील कार्यालयात
सेतु केंद्रात
ऑनलाईन अर्जासाठी शासनाची अधिकृत वेबसाईट :
🔗 https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate_Documents?ServiceId=2236
◼️ निष्कर्ष
वृद्धत्वात आधार देणारी श्रवण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ही शासनाची संवेदनशील योजना आहे. या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो निराधार वृद्धांना दिलासा मिळत असून त्यांचे आयुष्य थोडेसे सुसह्य होत आहे.
अशाच प्रकारच्या बातम्या तसेच नोकरीच्या संधी जाणून घेण्यासाठी व्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा
Click Here To Join Whats App Group
अथवा खालील QR Code स्कॅन करा
insta news facebook Page