सावधान..! तुम्ही हॉस्पटलस च्या जाळ्यात फसत तर नाहीत ना? सविस्तर माहिती वाचा नाहीतर तुमचेही होऊ शकते लाखोंचे नुकसान..!

आपल्या शरिरातील महत्त्वाचा आणि नाजूक अवयव म्हणजे हृदय.याच हृदयाला जपण्यासाठी भरपूर काळजी घ्यावी लागते. हृदयविकाराचा एखादा झटका देखील जीवघेणा ठरू शकतो. धावपळीच्या जीवशैलीत याचं प्रमाण वाढलंय. अगदी तरुण वयातही अनेकांनी यामुळे जीव गमवलाय.आणि याचाच फायदा घेऊन काही हॉस्पिटलस पेशंट ला लुबाडताना दिसताहेत. ते कस हेच आपण या लेखात पाहणार आहोत.

आपल्याला कधी कधी एक्स्ट्रा स्ट्रेस असल्यामुळे,अपचन झाल्यामुळे अथवा काही शारीरिक काम केल्यामुळे देखील आपल्या छातीत दुखू शकते..!
अशावेळी आपण साहजिकच लगेच डॉक्टर चा सल्ला घेण्यासाठी हॉस्पटल ला जातो.आणि अशा वेळी लगेच डॉक्टर कडे गेलं देखील पाहिजे.

परंतु काही डॉक्टर याच आपल्या भीतीचा फायदा घेऊन नको त्या टेस्ट करायला सांगतात. किंवा तुम्हाला काही दिवस ऍडमिट देखील करून घेऊ शकतात. आपल्याला देखील जास्त माहिती नसल्यामुळे डॉक्टर नि सांगितल्याप्रमाणे आपण सर्व काही करतो. पण आपण करतोय ती प्रोसेस बरोबर आहे का चुकीची हे आपल्याला माहितच नाही. अशा वेळी एखाद्या दुसऱ्या डॉक्टर चा सल्ला घेणं देखील फायदेशीर ठरत.

२- ४ दिवसापूर्वी माझ्या मित्राला छातीत दुःखात आहे म्हणून तो एका हॉस्पिटल मध्ये गेला. तिथे त्याला अ‍ॅन्जिओग्राफी करायला सांगितली आणि ४ दिवस ऍडमिट करून घेतलं. परंतु दुसऱ्या डॉक्टर चा सल्ला घेतला असता त्यांनी स्ट्रेस टेस्ट करायला सांगितली आणि त्यामध्ये एकही ब्लॉकेज नसल्याचं समोर आलं..! याचाच अर्थ जर पहिल्याच हॉस्पिटल नि त्याची स्ट्रेस टेस्ट केली असती तर त्यांना अ‍ॅन्जिओग्राफी करायची आणि ऍडमिट रहायची गरजच भासली नसती आणि साहजिकच त्यांचा झालेला खर्च देखील झाला नसता.

त्यामुळेच आम्ही तुम्हाला या लेखात काही स्टेप्स सांगणार आहोत.आणि जर तुमचे डॉक्टर त्याच्या वातिरिक्त आपल्यास काही वेगळ्या टेस्ट करण्यास सांगत असतील तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता..!

स्ट्रेस टेस्ट:
हि सर्वात सोप्पी टेस्ट असून यामध्ये आपल्या शरीरात ब्लॉकेज आहेत का याचा साधारण अंदाज येतो.यासाठी तुम्हाला ऍडमिट राहायची गरज नाही आणि खर्च देखील कमी आहे. (म्हणून काही हॉस्पिटल स्ट्रेस टेस्ट न करता अ‍ॅन्जिओग्राफी करण्याचा सल्ला देतात)

अँजिओग्राफी:
स्ट्रेस टेस्ट मध्ये ब्लॉकेज आहेत समजल्यानंतरच अँजिओग्राफी करावी ज्यामध्ये ब्लॉकेज कुठे आहेत हे कळेल.

अ‍ॅन्जोप्लास्टी आणि बायपास:
अ‍ॅन्जिओग्राफी झाल्यानंतर ब्लॉकेजची संख्या कमी असेल तर एन्जोप्लास्टी करण्यात येते. ब्लॉकेज अधिक असले तर बायपास करण्यात येते.

या आहेत खूप सध्या आणि सोप्या स्टेप्स..!

परंतु काही डॉक्टर आणि हॉस्पिटल यांना आला पेशंट कि करा त्यांची अ‍ॅन्जिओग्राफी करा, ऍडमिट करून घ्या आणि उकळा पैसे असा धंदा सुरु केलाय. अरे अ‍ॅन्जिओग्राफी करायच्या आधी स्ट्रेस टेस्ट करून ब्लॉकेज आहेत का नाहीत हे तर चेक करा.

आणि तुम्ही लक्षात ठेवा जर कुठल्याही हॉस्पिटल मध्ये स्ट्रेस टेस्ट च्या अगोदर आपल्याला अ‍ॅन्जिओग्राफी करण्यास सांगत असतील तर आपण दुसऱ्या डॉक्टर चा सल्ला घेणं गरजेचं आहे.

हृदय विकाराची लक्षणे
धाप लागणे, पाठीत भरून येणे, उजवा किंवा डावा हात जड झाल्यासारखा होणे, भरपूर घाम येणे, जीभ जड होणे, जबडा दुखणे, डोकं दुखणे आदी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.

उपाय

  • नियमित व्यायाम अथवा योगासने करावीत. दिवसासातील कमीत काम २०-३० मिनिटे हि व्यायामासाठी दिली गेली पाहिजे.
  • वजन आटोक्यात ठेवावे.
  • आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या , विविध फळे व मोड आलेली कडधान्ये तसेच लसूण याचा समावेश आसवा.
  • मांसाहार, चरबीयुक्त पदार्थ, तेलकट पदार्थ, फास्ट फूड , बेकरी फूड हे पदार्थ आहारात टाळावे.
  • मानसिक तणावापासून दूर रहावे.
  • धूम्रपान व मद्यपान किंवा इतर व्यसनापासून दूर रहावे

या काही गोष्टींचा अवलंब करून आपण हृदय विकारापासून लांब राहू शकतो.