महाराष्ट्रात तलाठी भरती निघाली..! पहा तुमच्या जिल्ह्यात किती आहेत जागा.
महाराष्ट्रात तलाठी भरती निघाली..! पहा तुमच्या जिल्ह्यात किती आहेत जागा.
मित्रांनो आता सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. खूप दिवस अभ्यास करून देखील नशीब साथ देईलच असे नाही. मागील काही दिवसात तर कुठली भारतीय निघाली नाही. आणि निघालीच तर अगदीच कमी जागांची भरती निघते. त्यामुळे अभ्यास करणारे विध्यार्थी त्रासून जातात. परंतु ठीक आहे आपण अशा न सोडता अभ्यास करत राहिला पाहिजे आणि यश नक्कीच एक दिवस आपल्याला मिळेल
गेल्या अनेक दिवसांपासून ज्या तलाठी भरतीची वाट पाहिली जात होती ती तलाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 4,644 रिक्त तलाठ्यांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.
खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी तलाठी भरतीची फेक न्युज वायरल झाली होती. यामुळे या भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. पण आता राज्य शासनाच्या महसूल विभागाने तलाठी भरतीची जाहिरात काढली आहे.
या पदभरतीनुसार 36 जिल्ह्यातील रिक्त तलाठी पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विशेषता तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मित्रांनो भरती जरी निघाली असली तरी बऱ्याच विध्यार्थ्यांना हा प्रश्न असतो कि फॉर्म कुठल्या जिल्ह्यात भरल्यावर आपल्याला फायदा होईल. कुठल्या जिल्ह्याचं मेरिट कमी लागेल, कुठल्या जिल्ह्याचे मेरिट जास्त लागेल असे एक ना अनेक प्रश्न विधार्थ्यांना सतावत असतात. पण अशा वेळी विद्यार्थ्यांनी गोंधळून न जात योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. या लेखात आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात किती जागा आहेत याची परिपूर्ण माहिती मिळेल. त्यामुले हा लेख संपूर्ण वाचून मगच फॉर्म भरायला घ्या.
दरम्यान, आज आपण तलाठी पदभरतीसाठी आवश्यक असलेल्या पात्रता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासोबतच, आज आपण महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या भरतीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील किती रिक्त तलाठी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत याबाबतही जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.
तलाठीपदाच्या जिल्ह्यानुसार रिक्त जागा खालील प्रमाणे
नासिक 208
धुळे 205
नंदुरबार 54
जळगाव 208
अहमदनगर 250
छत्रपती संभाजी नगर 161
जालना 118
परभणी 105
हिंगोली 76
नांदेड 119
लातूर 63
बीड 187
उस्मानाबाद 110
मुंबई शहर 19
मुंबई उपनगर 43
ठाणे 65
पालघर 142
रायगड 241
रत्नागिरी 185
सिंधुदुर्ग 143
नागपूर 177
वर्धा 78
भंडारा 67
गोंदिया 60
चंद्रपूर 167
गडचिरोली 158
अमरावती 56
अकोला 41
वाशिम 19
यवतमाळ 77
बुलढाणा 49
पुणे 383
सातारा 153
सांगली 98
सोलापूर 197
कोल्हापूर 56
तलाठी पदासाठीच्या पात्रता खालील प्रमाणे
या पदासाठी पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत.
तसेच पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
सोबतच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान देखील असणं आवश्यक आहे.