आजकालच्या तरुणांची मानसिकता चाललीय तरी कुठ ?
आजकालच्या तरुणांची मानसिकता चाललीय तरी कुठ ?
आपण काहीच दिवसांपूर्वी दर्शना पवार या तरुणींची तिच्याच मित्राने निर्घृण हत्त्या केलेली बातमी पहिली. बाहेर गावावरून पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला यायचं, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करायची. आणि खूप कष्ट करून यश देखील मिळवायचं पण अगदी छोट्याश्या चुकीसाठी सगळं आयुष्य गमवायचा. तशी ती चूक म्हणताच येणार नाही. चूक एव्हडीच कि आपल्याच व्यक्तीवर जरा जास्त विश्वास ठेवला आणि आपल्याच व्यक्तीने आपला घात केला.
संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. काय अवस्था झाली असेल त्या आई वडिलांची ज्यांनी हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या मुलीची एका नराधमाने अशी अवस्था केली हे कळल्यावर.
या गोष्टीला अजून ८ दिवस देखील झाले नाहीत तो पर्यंत काल पुण्यात एक तरुण तरुणीला मारण्यासाठी कोयता घेऊन आला.तो इतका बेफाम होता कि काही करून त्या मुलीचा जीव घेण्यसाठी तो धावत होता. आपण सर्वांनी सी सी टी व्ही मध्ये हि घटना देखील पहिली . सुदैवाने तिथे अभ्यास करत असणार्या एम पी एस सी च्या मुलांनी त्या मुलीला वाचवलं पण एव्हडी निष्टुरता यांच्यात येतेय तरी कुठून. एखादी मुलगी आपल्याला प्रेमसंबंध ठेवायला नाही म्हणाली म्हणून तिचा तुम्ही जीवच घेणार हा कुठला न्याय.
मागे काही दिवसांपूर्वी दिल्लीतील घटना असो किंवा मीरा रोड वरील घटना असो. सर्व गोष्टी जवळच्याच लोकांनी केल्या. एखाद्याचा जीव घेणं एव्हडं सोप्प झाली का आता. एका घटनेमागे किती तरी आयुष्य, किती तरी कुटुंब उद्धवस्त होतात हे कसा काळात नाही या लोकांना.
मंत्रांनो हे सर्व मीडिया वाले ४-८ दिवस या एखादी अशी बातमी दाखवतात नंतर ते विसरून जातात आणि समाज देखील विसरून जातो.
नंतर आपण तेव्हाच जागे होतो जेव्हा परत अशा घटना घडतात. अशा आरोपींना खरंतर लावकारात लवकर कठोर मधली काठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्यांना झालेली शिक्षा एव्हडी कठोर असायला हवी कि परत असा गुन्हा करायच्या विचार देखील एखाद्याच्या मनाला शिवला नाही पाहिजे.
सध्या आरोपी पकडला गेला एवढच आपल्याला कळत, पण नंतर अश्या आरोपींच काय होत. त्यांना किती कठोर कठोर झाली. ती पण येउद्यात समाजाच्या समोर. त्या बातम्या चालवा ४-८ दिवस. तेव्हा कुठे समाजातील असे तयार होणारे नाराधाम जगाच्या जागी गप्प बसतील.
खरंतर अश्या नराधमांना आपल्या घरच्यांची देखील काळजी नसते. कारण एखाद्या आरोपींच्या आई वडिलांवर देखील जी मन खाली घालून आयुष्यभर जगायची वेळ येते याची कल्पना देखील या आरोपीना करता येत नाही.