महाराष्ट्रातील उन्हाळ्यात फिरण्यासाठी योग्य पर्यटन स्थळे

महाराष्ट्रातील उन्हाळ्यात फिरण्यासाठी योग्य पर्यटन स्थळे : आपला महाराष्ट्र विविधतेने नटलेला आहे. या महाराष्ट्रात उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा सर्व ऋतू आपल्याकडे स्पेशल असतात.उन्हाळ्यात शाळांना सुट्टी देखील असतात, पण ऊन जास्त असल्यामुळे आपल्याला उन्हाळ्यात पर्यटनाचा आनंद घेता येत नाही. आधीच ऊन जास्त त्यात घराबाहेर नको पडायला असा आपल्याला वाटत. पर्यटनास जाण्याची इच्छा असते, शाळांना कॉलेजेस ना सुट्ट्या असतात परंतु आपण उन्हाळ्यात शक्यतो फिरायला जाण्याचा प्लॅन करत नाही. पण म्हणल ना आपला महाराष्ट्रात सगळेच ऋतू स्पेशल असतात. कारण आपल्याकडे उन्हाळ्यात देखील थंड हवेचा अनुभव देणारी काही ठिकाणे आहेत जिथे आपण पर्यटनास अवश्य जाऊ शकतो. चला तर मग पाहुयात अशी कोण कोणकोणती ठिकाणे आहेत जिथे आपण उन्हाळ्यात देखील पर्यटनास जाऊ शकतो.

१. महाबळेश्वर – उन्हाळ्यात पर्यटनास जायचं असेल तर सर्वच पहिला पर्याय येतो तो म्हणजे महाबळेश्वर. येथील थंड हवामान आणि निसर्ग सौन्दर्य उन्हाळ्यात देखील पर्यटकांना महाबळेश्वर ला येण्यास भागच पाडते.

महाबळेश्वर ची वैशिष्ठे
थंड हवामान आणि सुंदर निसर्ग.
वेण्णा लेक, प्रतापगड किल्ला, ऑर्थर सीट पॉइंट.
स्ट्रॉबेरी फार्म्सही प्रसिद्ध.
ट्रॅव्हल टिप्स:
सकाळी लवकर पॉइंट्स बघायला जा, गर्दी कमी असते.
स्ट्रॉबेरी सीझनमध्ये स्ट्रॉबेरी खाणं आणि घेऊन यायला विसरू नका.
थंडीमुळे हलकी स्वेटर बरोबर घ्या.

२. पाचगणी – महाबळेश्वर पासून अगदी जवळ असलेला हे ठिकाण देखील अत्यंत निसर्ग सौन्दर्यानी नटलेले आहे. आणि इथे देखील आपणास चांगल्या प्रकारचे पर्यटन स्थळे पाहायला मिळतील
पाचगणी ची वैशिष्ठे
महाबळेश्वरच्या जवळच आहे.
टेबल लँड, सिडनी पॉइंट, पर्सन पॉइंट.
शांत आणि आल्हाददायक वातावरण.
ट्रॅव्हल टिप्स:
टेबल लँडवर सूर्योदय आणि सूर्यास्त नक्की बघा.
सायकलिंग आणि हॉर्स रायडिंगचे अनुभव घ्या.
स्थानिक बाजारातून चविष्ट जॅम आणि जेली घ्या.

महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचा आढावा व त्यांचा ऐतिहासिक वारसा.

३. माथेरान – मुंबईपासून जवळ आणि काही तासांच्या अंतरावर असलेलं माथेरान हे ठिकाण देखील थंड हवामान मुळे प्रसिद्ध आहे.
माथेरान ची वैशिष्ठे
गाड्यांना बंदी, फक्त घोडा किंवा पायी फिरायचं.
अलेक्झांडर पॉइंट, चार्लट लेक प्रसिद्ध.
ट्रॅव्हल टिप्स:
फक्त पायी किंवा घोड्यावरून प्रवास. आरामशीर बूट घाला.
छोट्या खेळण्यांच्या गाड्या (toy train) चा अनुभव घ्या.
प्लास्टिकला बंदी आहे, स्वच्छता राखा.

४. भंडारदरा-
भंडारदरा ची वैशिष्ठे
नाशिकजवळील शांत ठिकाण.
भंडारदरा धरण, रंधा फॉल्स, अंबरनाथ लेक.
निसर्गप्रेमींसाठी आदर्श.
ट्रॅव्हल टिप्स:
धरणाजवळ कॅम्पिंगचा अनुभव मस्त असतो.
उन्हाळ्यात पाण्यात पोहायला किंवा फेरी घ्यायला चांगलं हवामान असतं.
रंधा फॉल्स उन्हाळ्यात कमी पाण्यानेही सुंदर दिसतो.

५. लोणावळा आणि खंडाळा
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले.
भुशी धबधबा, कार्ला-भाजा लेणी.
उन्हाळ्यातही थोडं थंडगार वातावरण.
ट्रॅव्हल टिप्स:
लोणावळ्याचा प्रसिद्ध चिक्की नक्की खा.
ट्रेकिंग आवडत असेल तर राजमाची किल्ला किंवा टुंगार्ली लेक ट्रेक करा.
सकाळी लवकर भुशी डॅमला जा, नंतर खूप गर्दी असते.

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय?

६. इगतपुरी
नाशिकजवळील प्रसिद्ध हिल स्टेशन.
धरणे आणि ट्रेकिंग साठी उत्तम.
शांतता आणि निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळतं.
ट्रॅव्हल टिप्स:
Meditation Center (Vipassana) भेट देऊ शकता.
ट्रेकर्ससाठी काम्बे फोर्ट किंवा त्रिंबकगड ट्रेक चांगले पर्याय आहेत.
आरामासाठी रिसॉर्ट बुक करणे उत्तम.

७. आंबोली – कोकण म्हणले कि आपल्याला सर्वात पहिले आठवतात ते समुद्र किनारे. पण उन्हाळ्यात समुद्र किनाऱ्यांपेक्षा
कोकणातील एक सुंदर थंड ठिकाण.
धबधबे आणि दाट जंगलं.
निसर्ग निरीक्षणासाठी सर्वोत्तम.
ट्रॅव्हल टिप्स:
उन्हाळ्यातही इकडे थंड हवामान असतं.
निसर्ग निरीक्षणासाठी बायनॉक्युलर्स (दुर्बी) बरोबर ठेवा.
आंबोली धबधबा आणि हिरवळीने भरलेले घाट खूप सुंदर दिसतात.

insta news facebook Page

टीप:
उन्हाळ्यात फिरताना हलके कपडे, टोपी, सनस्क्रीन वापरणं आवश्यक.
शक्य असल्यास अगोदर बुकिंग करून जा, कारण सुट्टीच्या काळात गर्दी असते.

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *