घरी बसून करता येण्यासारखे काही ऑनलाईन उद्योग
मित्रानो सध्या मार्केट मध्ये नोकरी मिळावं तसं कठीणच झालं आहे. तुमच्याकडे कौशल्या असले तरी त्यानुसार तुम्हाला नोकरी मिळेलच असे नाही. कारण पदवी घेऊन बाहेर पडत असलेले विध्यार्थी आणि त्यामानाने दरवर्षी निर्माण होणाऱ्या नोकऱ्या यामध्ये खूप तफावत आहे. अजून काही वर्षानंतर तर हि परिस्तिथी अजूनच भयंकर असेल. परंतु यामध्ये आपल्याकडे जर ऑनलाईन स्किल असतील तर तुम्ही मार्केट मधून चांगल्या प्रकारे अर्निग करू शकता. परंतु ऑनलाईन काम करायचं म्हणजे नक्की करायचं तरी काय हा देखील प्रश्न आहेच. मग कधी कधी चुकीच्या लोकांच्या मार्गदर्शनामुळे किंवा सायबर फ्रॉड लोकांमुळे आपले ऑनलाईन नुकसान देखील होऊ शकते. पण मग योग्य निर्णय काय घ्यावा आणि ऑनलाईन बिजनेस काय करावा यावर आपण या लेखात थोडी माहिती पाहणार आहोत.
सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात कि ऑनलाईन बिजनेस करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गीष्टींची आवश्यकता आहे.
सर्वप्रथम आपल्याला लागेल तो एक कॉम्पुटर अथवा लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन. इंटरनेट कनेक्शन अगदी चांगल्या स्पीड चा असेल तर अति उत्तम कारण youtube वर बिजनेस करण्यासाठी ते महत्वाचे ठरेल.
तर आता आपण पाहुयात कि कोणकोणते बिजनेस आपण घरी बसल्या बसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकतो.
ज्या पद्धतीने तुझ्या पात्रांमध्ये बदल करतोस त्याप्रमाणे तू एक गिरगिट आहेस – कतरीना कैफ
1. फ्रीलान्सिंग (Freelancing)
जर तुम्हाला लेखन, ग्राफिक डिझाईन, वेब डेव्हलपमेंट, व्हिडीओ एडिटिंग, डिजिटल मार्केटिंगया सारख्या गोष्टी मध्ये रस असेल तर आपण हि फिल्ड निवडू शकता. तुम्हाला फ्रीलान्सिंग करण्यासाठी तुम्ही Fiverr, Upwork, आणि Freelancer यासारख्या प्लॅटफॉर्मवर काम मिळवू शकता आणि चांगल्या प्रकारे अर्निग करू शकता.
2. डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट
आजकाल सर्व कंपन्यांना सोशल मीडिया एजन्सी ची गरज आहे. प्रत्येकाला आपल्या कंपनी ची प्रोफिले सोशल मीडिया वर असणे गरजेचे वाटते. कित्यके लोक ओल सर्व बिजनेस देखील सोशल मीडिया वरून करतात. मग अशा लोकांसाठी तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट, फेसबुक/इंस्टाग्राम ऍड मॅनेजमेंट, कंटेंट क्रिएशन यासारखी कामे करून चांगली कमाई करता येते.
सोशल मीडिया प्रमाणेच सर्व लोकांच्या त्यांच्या व्यवसायांसाठी SEO (सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन)ची देखील गरज असतेच. त्यातूनही खुओ व्यवसाय वाढीसाठी मदत होते त्यामुळे आपण कंपन्यांसाठी SEO करून त्यांचा ऑनलाईन व्यवसाय वाढवू शकता.
3. ब्लॉगिंग किंवा यूट्यूब चॅनेल सुरू करणे
जर तुम्हाला एखाद्या विषयावर चांगली माहिती असेल, तर तुम्ही ब्लॉग किंवा यूट्यूब चॅनेल सुरू करू शकता. ज्यामध्ये आपण विविध विषयांवर ब्लॉग्स लिहू शकता. जसा कि एखाद्याला ट्रॅव्हलिंग ची आवड असेल तर तो ट्रॅव्हलिंग वर ब्लॉगिंग सूरु करू शकतो. त्यामध्ये विविध राज्यातील ट्रॅव्हलिंग स्पॉट्स तसेच विविध सिटी मध्ये बघण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत, तेथील जेवणातील विशेष असे पदार्थ काय आहेत. आणि ते कुठे कुठे चांगले मिळतात असा सर्व गोष्टी घेऊन आपण एखादी ब्लॉगिंग वेबसाईट सुरु करू शकता.
4. एफिलिएट मार्केटिंग
एफिलिएट मार्केटिंग हा देखील आपल्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी चांगला पर्याय आहे. जॅमध्ये Amazon, Flipkart, Meesho यांसारख्या कंपन्यांचे प्रॉडक्ट्स प्रमोट करून तुम्ही कमिशन मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमची स्वतःची वेबसाइट किंवा सोशल मीडिया अकाउंट्स उपयोगात आणावी लागतील.
भारतातील भगवान शिवाची १२ ज्योतिर्लिंगे: भगवान शिवाची उपासना करण्यासाठी दैवी आध्यात्मिक स्थळे
5. ऑनलाईन टिचिंग आणि कोचिंग
सध्या शिक्षणाला मोठ्या प्रमाणात महत्व आले आहे. तुम्हाला कोणत्याही विषयाचा चांगला अभ्यास असेल, तर तुम्ही ऑनलाइन कोचिंग सुरू करू शकता.
Udemy, Teachable, Unacademy यांसारख्या प्लॅटफॉर्मवर तुमचे कोर्स विकू शकता.
6. कंटेंट रायटिंग आणि ट्रान्सलेशन
इंग्रजी किंवा इतर भाषांमध्ये चांगले लिहिता येत असेल, तर तुम्ही वेब आर्टिकल्स, ब्लॉग पोस्ट, ई-बुक्स लिहून पैसे कमवू शकता.
ट्रान्सलेशनचेही मोठे मार्केट आहे, विशेषतः इंग्रजी ते हिंदी किंवा मराठी भाषांमध्ये.
7. व्हिडिओ एडिटिंग आणि अॅनिमेशन
जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग, मोशन ग्राफिक्स, किंवा अॅनिमेशन येत असेल, तर तुम्ही फ्रीलान्सिंग करून कमाई करू शकता.
8. ऍप किंवा वेब डेव्हलपमेंट
तुम्हाला कोडिंग येत असेल, तर वेबसाइट किंवा मोबाइल अॅप्स डेव्हलप करून विकू शकता.तुम्ही Webflow, WordPress किंवा Shopify सारख्या साधनांचा वापर करून वेब डिझाइनिंगही करू शकता.
9. डेटा एंट्री आणि टायपिंग जॉब्स
घरबसल्या डेटा एंट्री, ट्रान्सक्रिप्शन, आणि इतर टायपिंग जॉब्स करता येतात.
10. POD (Print on Demand) बिझनेस
स्वतःचे टी-शर्ट, मग्स, फोन कव्हर डिझाइन करून ऑनलाइन विक्री करू शकता (Printful, Printify यासारख्या प्लॅटफॉर्मवर).
वरील सर्व कामे करण्यासाठी नक्कीच आपल्याला चांगले स्किल्स असणे गरजेचे आहे. आणि नसतील तरी यातील काही स्किल्स आपण आत्मसात करून आपल्या आपल्या उत्पन्नात भर पडू शकता.
insta news facebook Page