नुह चे दंगे, गुरुग्राम मध्ये झालेला अत्याचार, दोषी कोण ?
नुह हा हरियाणा मधील एक जिल्हा आहे ज्यामध्ये ८० टक्के मुस्लिम राहतात संपूर्ण हरियाणा मधील ८० % मुस्लिम समाज हा इथेच राहतो.नुह चे दंगे, गुरुग्राम मध्ये झालेला अत्याचार, दोषी कोण ? नुह मेवात मध्ये नलहर महादेवाचं मंदिर आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग डाळ हे मेवात मध्ये असलेल्या मंदिरात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी यात्रा काढण्यास सुरवात केली.
यात्रेच्या आधी झालेल्या घटना.
यात्रेच्या काहीदिवस आधी मोनू मानेसार या व्यक्तीने भडकाऊ भाषण करून आपल्या युट्युब चॅनेल वर प्रकाशित केले. ज्यामध्ये त्याने आपण मेवात यात्रेमध्ये येणार आहोत आणि कुणाला काय करायच ते करा आशय शब्दात भडकाऊ वक्तव्य केला होत. दुसरीकडे सोमवारी ३१ जुलै रोजी विश्व हिंदू परिषद च्या जनरल सेक्रेटरी यांनी नलहर मंदिरामध्ये दंगेच्या आधी असच भडकाऊ भाषण केलं होत ज्यामध्ये आता मेवात चा वक्तिमत्व आता आपण बदलायला हवं असा वक्तव्य त्यांनी केलं होत.
मोनू मानेसार कोण आहे?
प्रत्येकाला प्रश्न पडला असले कि हा मोनू मानेसार कोण आहे. त्याच्या एका विडिओ मुले एवढा सगळं झालं. मोनू मानेसार हा बजरंग दलाचा कार्यकता आहे. तो गोरक्षक म्हणून देखील काम करतो. त्याचा स्वतःचा युट्युब चॅनेल देखील आहे. आणि तो गोरक्षण कसे करतो याचे अनेक विडिओ त्याने या युट्युब चॅनेल वर टाकले आहेत. फेब महिण्यात याच मोने मानेसार याने २ मुस्लिम व्यक्तींना ठार केलं होत. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला असला तरी अजूनत्याच्या वर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. म्हणून मुस्लिम समाजमध्ये त्याच्याबद्दल आक्रोश आहे.
नुह मध्ये त्यादिवशी नेमकं काय घडलं?
३१ जुलै ला ठरल्याप्रमाणे यात्रेला सुरवात झाली पण थोड्याच वेळात दगडफेक सुरवात झाली. कोण म्हणत ट्राफिक झाल्यामुळे वाद झाला अंडी दगडफेक सुरवात झाली तर कोण म्हणत मोनू मानेसार ची गाडी आहे यामध्ये म्हणून लोकांनी दगडफेक केली.
मुस्लिम समाजातील युवकांनी सुरवातीला दगडफेक सुरवात केली. ते विडिओ मुळे पूर्वतयारी मध्येच होते. त्यांनी घराच्या टेरेस वरून देखील दगडफेक चालू केली होती. दुसरीकडे बजरंग दलाचे कार्यकर्ते देखील काठ्या , बंदूक, तलवारी घेऊन रस्त्यावर उतरले होते. नांव खूप वाढला होता. दुकान फोडली गेली, जाळपोळ झाली, नंतर दोन्ही समाजातील लोकांनी गोळीबार सुरु केले. संध्याकाळ पर्यंत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली परंतु तोपर्यंत दोन पोलीस देखील मारले गेले होते.