दिनांक ३१ जुलै २०२३ वेळ सकाळचे ५ ते ५. ३० असेल अंदाजे. जयपूर मुंबई सेंट्रल सुपर फास्ट एक्सप्रेस बोगी नं बी-५ मध्ये एक भयानक घटना घडली. कॉन्स्टेबल चेतन सिग या आर पी एफ मधील जवानाने त्याचेच वरिष्ठ अधिकारी टीकाराम मीना यांच्यावर गोळी झाडली.सुरवातीला थोडाफार वाद सुरु झाला आणि तो वाद इतक्या विकोपाला पोहोचला कि त्याने त्यांच्यावर गोळी झाडून त्यानं जागीच ठार केले.माथेफिरू आर पी एफ जवानाने का केला रेल्वे मध्ये गोळीबार ?
एवढे करून हा माथेफिरू जावं थांबला नाही तर त्याने इतर बोगी मध्ये जाऊन इतर प्रवाश्यांवर देखील गोळीबार केला आणू त्यांना देखील ठार केले. हा का करतोय, कशासाठी करतोय हे कळण्याआधी ४ लोकांचा जीव गेला होता. अब्दुल कादिर, अजगर काई आणि सादर मोहोम्मद अशी त्याने ठार केलेल्या इतर प्रवाश्यांची नाव.
इतकी भयानक कृत्य करणाऱ्या माथेफिरू जवानाला मीरा रोड या ठिकाणी पकडण्यात आलं. तर इतर मृत वक्तीची शव बोरिवली स्टेशन येथे उतरवण्यात अली.
चौकशी मध्ये काय आला समोर.
त्या माथेफिरू जवानांची आणि इतर सर्व अँगल डोळ्यासमोर ठेऊन चौकशी सुरु केली असता वेगळीच माहिती समोर अली. आर पी एफ पोलिसांकडून चेतन सिंग हा खूप रागीट असून त्याला रागावर नियंत्रण राहत नसल्याचं सांगण्यात आला.
चेतन सिंग च्या सहकाऱ्यांनी दिलेली इतर माहित काय आहे?
चेतन सिंग च्या सहकार्यांनी सांगितलं जेव्हा तो त्याची गण घेण्यासाठी गेला त्यावेळेस त्याला ती गण देण्यास नकार दिला गेला. पण आपल्याला आपली गण का दिली जात नाही म्हणून त्याने वरिष्ठ अधिकाऱ्याचा गळा दाबला. नंतर सोडावा सोडव झाल्यानंतर त्याला त्याची गण देण्यात आली.
शेतकऱ्यांसाठी खुश खबर..! Nong Hyup बँक RBI Act 1934 च्या दुसऱ्या शेड्युल मध्ये समाविष्ट होणार.
कोण आहे चेतन सिंग.
मूळचा हाथरस येथील रहिवासी असलेला चेतन सिंग १२ दिवसाची त्याची सुट्टी संपवून १८ जुलै ला परत त्याच्या कामावर रुजू झाला. पण त्याच्या ट्रान्सफर मुले तो खुश न्हवता. त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या वरिष्ठांकडून त्याला त्रास दिला जायचा.
हे तो सांगत होता पण जे झालं ते योग्य झालं का ?
त्याच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आला कि त्याच्या मानसिक स्वस्थ ठीक न्हवत पण खरंच तास होत का? असेल तर त्याच कारण काय? आणि खरंच असा असेल तर तो अजून कामावर राजी कसा होता?
त्याने मारलेले इतर प्रवाशी सर्व मुस्लिम.
चेतन सिंग जर मानसिक रित्या स्वस्थ न्हवता तर त्याने आपल्या वरिष्ठाला मारून इतर बोगीतील फक्त मुस्लिम व्यक्तींनाच का मारलं? त्याने वरिष्ठाला मारल्यानंतर इतर दोन बोगीमध्ये जाऊन फक्त मुस्लिम समाजातील प्रवाश्यांनाच का मारलं. तो त्यांना मारून इथेच थांबला नाही तर हे करत असताना त्याने इतर प्रवाश्यांना त्याने विडिओ काढण्यास सांगितले. त्या ५१ सेकण्ड च्या विडिओ मध्ये तो फक्त मोदी आणि योगी ला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसतोय लोकांना. मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या चेतन सिंग ला एवढा सेन्स बरा होता कि तो लोकांना मोदीला आणि योजिला मतदान करायला सांगत होता.
मूळ कारण काय?
आपण रोज सहजरित्या आपला फोन चालत रहातो. रोज आपण फेसबुक , इन्स्टा , ट्विटर ,युट्यूब ऍप वर नेहमी विविध विडिओ पाहत असतो. आपण त्याच्यावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सत्य मानून चालायला लागतो. आपण कधीच त्याची पडताळणी करत नाही कि हे खरंच सत्य हे का?
आपण एखादा विडिओ पाहतो आणि लगेच त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो.आपण कधीच बघत नाही कि त्या विडिओ यामध्ये किती सत्याता आहे. त्याच्या आधी काय घडलं असेल याचाही विचार आपण करत नाही.
आपण या सोशल मीडिया वर एखादी गोस्ट जास्त वेळा पहिली किंवा लाईक केली कि आपल्याला तसेच विडिओ सतत दिसायला लागतात. आणि आपण नकळत एखाद्या जिस्तीची एकाच बाजू पाहायला सुरवात करतो. आणि हे सतत घडत असल्यामुले आपले विचार सुद्धा तसेच बनत जातात.
नकळत शेवटी आपण एखाद्या वाईट गोष्टीला साथ द्यायला सुरवात करतो. कुणी वाईट जरी केला तर त्याने तेच बराबर कसा असेल या दृष्टीने आपण विचार करायला सुरवात करतो.
चेतन सिंग ने जे केला ते खूप वाईट होत. त्याची त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पण आपण देखील किंवा आपली मूळ अशा सोशल मीडिया मध्ये अडकलेली नाहीत ना याकडे लक्ष द्या .