सरसकट पीकविमा पाहिजे तर शेवटचे ५ दिवस बाकी मिळणार १३५०० रु.

शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा पाहिजे तर यासाठी संपूर्ण प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून राज्यभरातून सुमारे १.२५ कोटी शेतकऱ्यांची लाभार्थी यादी देखील तयार झाली आहे आणि अजूनही शेतकऱ्यांना शेवटची संधी देण्यात आली असून हे काम न केल्यास शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे पाहूया सविस्तर माहिती.
महाराष्ट्र राज्यातील तब्बल १ कोटी 70 लाख आणि ६७ हजार शेतकऱ्यांनी यावर्षी म्हणजेच २०२३ ला आपला पिक विमा भरला होता.यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना केवळ १ रु.मध्ये पिक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती आणि उर्वरित सर्व रक्कम राज्य सरकार विमा कंपन्यांना देणार असल्याचे सांगितले होते आणि त्यामुळेच यावर्षी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचा पिक विमा भरला होता.

योजनेचे नाव :  प्रधानमंत्री पिक विमा योजना
विभाग : महाराष्ट्र राज्य कृषी व महसूल विभाग
लाभार्थी : राज्यातील सर्व शेतकरी
वर्ष : २०२३
लाभ  : रक्कम २५% पिकविमा रक्कम

शेतकऱ्यांना पिक विमा लाभ देण्यासाठी अजूनही शेवटची संधी राज्य सरकार कडून देण्यात आलेली आहे.त्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना १५ ऑक्टोबर २०२३ हि शेवटची संधी आहे १५ ऑक्टोबर पर्यंत जर शेतकऱ्यांनी आपली ई पिक पाहणी नोंद केली नाही तर अशा शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम दिली जाणार नाही.

जरांगे पाटलांना दिलेलं आश्वासन पाळून आरक्षण दिले तर मंत्र्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू 

यातच आता १ रु.पिक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पिक विमा देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४०६ कोटी रुपये राज्य सरकारने विमा कंपन्यांना वितरीत केले आहेत.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसा अभावी नुकसान झालेले आणि ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता अशा सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.सव्वा कोटी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रक्कमेतील २५ टक्के रक्कम मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हि दिलासादायक बातमी आहे.

 

पिक विम्याची लाभार्थी यादी मधील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे.आता हि सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा योजनेचा लाभ जमा होणार आहे.परंतु ज्या शेतकऱ्यांनी त्यांची ई पिक पाहणी नोंद केली नाही अशा शेतकऱ्यांना पिक विमा अर्ज करून देखील पिक विम्याची रक्कम दिली जाणार नाही असे सरकार कडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

एवढेच नाही तर जे शेतकरी आपल्या पिकांची पिक पाहणी नोंद करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना पिक कर्ज असेल किंवा नुकसान भरपाई असेल यांचा देखील लाभ मिळणार नाही तसेच चालू वर्ष २०२३ चा सात बारा देखील अशा शेतकऱ्यांना मिळणार नाही.

पिक विमा योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठीइथे क्लिक करा

पिक विमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार ?

शेतकरी मित्रांनो पिक विमा योजनेसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांत सरसकट पिक विमा लाभ दिला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्र्यांनी त्याचसोबत जिल्हा अधिकाऱ्यांनी देखील केली होती.बीड,लातूर,नांदेड यासोबत अनेक जिल्ह्यांत सरसकट पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.परंतु शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी विमा कंपन्यांना अद्याप राज्य सरकार कडून पैसे मिळाले न्हवते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना निधी देण्यासाठी विमा कंपन्या गप्प बसल्या होत्या परंतु आता विमा कंपन्यांना सरकार कडून निधी वितरीत करण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती.पात्रता तपासण्यासाठी माहिती संपूर्ण वाचा.

शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 ऑक्टोबर २०२३ पर्यंत पिक विम्याचे पैसे जमा होतील असे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी सांगितले आहे त्यामुळे आता राज्यातील सव्वा कोटी शेतकऱ्यांना नवरात्र उत्सवातच चांगला लाभ सरकार कडून दिला जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे.
Insta News Facebook Page

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *