तुळजापूर नवरात्रोत्सवात ५ बॉम्बशोधक पथक, १२१७ पोलीस आणि १३८ अधिकारी तैनात.!

तुळजापूर नवरात्रोत्सवात ५ बॉम्बशोधक पथक, १२१७ पोलीस आणि १३८ अधिकारी तैनात.!
तुळजाभवानी व येढेश्वरी शारदीय नवरात्रोत्सवात जिल्हा पोलीस दलाने तगडे नियोजन केले आहे.भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी १२१७ पोलीस आणि १३८ अधिकारी तैनात.! तसेच ७०० होमगार्ड आणि २०४ विविध पथकातील कर्मचारी तसेच अधिकारी उपस्तित असतील.बॉम्बशोधक पथक दिवसातून ४ वेळा मंदिर परिसराची तपासणी करणार आहे .

नवरात्रोत्सवात महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून अनेक भाविक दाखल होतात. यंदा दररोज एक लाखाहून अधीक भाविक दाखल होण्याचा अंदाज आहे. पोलीस अधीक्षक श्री अतुलजी कुलकर्णी यांनी अतिशय तगडे नियोजन केले आहे.

मंदिर परिसरात जवळपास २८३ CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत.तसेच कारवाई वर लक्ष ठेवण्यासाठी २ स्वतंत्र पथके तयार करण्यात आलेली आहेत.

सुरक्षेसह वाहतूक मार्गातही बदल करण्या आलेले आहेत
पोलीस प्रशासनाने सुरक्षेसह वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आलेले आहेत. शहरातील अनेक मार्गावर एकेरी वाहतूक तसेच जाड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आलेली आहे.

शहरात विविध ठिकाणी प्रशस्थ पार्किंग.
भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरात विविध ठिकाणी पार्किंगची प्रशस्थ व्यवस्था करण्यात आलि आहे.
यामध्ये
१. नळदुर्ग रोड वर मस्के प्लॉटिंग आणि नावंदर पार्किंग
२. जगदाळे पार्किंग
३. धाराशिव रोडवर नगरपरिषद पार्किंग
४. हडको पार्किंग
५. सोलापूर मार्गावर भरती बुवा मठ पार्किंग
६. आरदवाडी पार्किंग
७. तालुका क्रीडा मैदान

इत्यादी पार्किंगचा समावेश आहे.

शहरात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध ठिकाणी पार्किंग तयार करण्यात आलेले आहेत.नागरिकांना कसलीही अडचण आल्यास लेगच जवळ असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे.तसेच सर्वानी शांततेत दर्शन घेऊन पोलीस प्रशासनास मदत करावी
पोलीस अधीक्षक
अतुल कुलकर्णी.

 

इस्रायल आणि पॅलेस्टिनी युद्ध अपडेट – हमासकडून युद्ध तीव्र करण्याची घोषणा.मृतांचा आकडा 1000 पार

Insta News Facebook Page

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *