इलेक्ट्रिक रिक्षा घेताय..! पुणे महानगर तुम्हाला देईल २५००० रुपये अनुदान..!

इलेक्ट्रिक रिक्षा घेताय..! पुणे महानगर तुम्हाला देईल २५००० रुपये अनुदान..!
Electric Riksha
इलेक्ट्रिक रिक्षा घेताय..! पुणे महानगर तुम्हाला देईल २५००० रुपये अनुदान..!

वाढते प्रदूषण टाळण्यासाठी महानगपालिकेचा स्तुत्य उपक्रम. इलेक्ट्रिक रिक्षा घेण्यासाठी पालिकेकडून मिळतेय चक्क २५००० रुपयांचे अनुदान..!
पुणे महापालिकेने इलेक्ट्रिक रिक्षामालकांना २५ हजार रुपयांच्या अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मनपा उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘शहरात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी १५ व्या वित्त आयोगांतर्गत पालिकेला अनुदान मिळाले आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिका ई-ऑटोंना २५ हजार रुपयांचे अनुदान देत आहे. पाच हजार ई-ऑटो धारकांना ही सबसिडी देण्याची आमची योजना आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) ई-रिक्षांची नोंदणी करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

शहरात मोठ्या प्रमानात वाहने असल्याने प्रदूषण वाढले आहे. दरम्यान, शहरातील अनेक रिक्षा या सीएनजीवर आहेत. सध्या सीएनजीचे दर देखील वाढले आहे. त्यामुळे दरवाढ झाली आहे. यामुळे वाढत्या प्रदूषण कमी करण्यासाठी आणि राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन कार्यक्रमानुसार पुण्यात हा उपक्रम राबवण्यात येणार असून यासाठी महापालिकेकडून हे 25 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याने रिक्षा चलकांना मोठा फायदा होणार आहे.

या सोबत पालिकेचा दुहेरी उद्देश देखील साध्य होणार आहे. शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी देखील महापालिकेकडून तीन चाकी आॅटो रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी 12 हजार रुपये अनुदान देण्यात आले होते.

अर्ज कुठे करावा
हा फॉर्म पीएमसीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. मालकाने फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे

निवड प्रक्रिया

अनुदानासाठी निवड झालेल्यांना पैसे दिले जातील

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *