सातबारा मिळेल आता तुमच्या मोबाइल वर..! शेतकऱ्यांनो हे मोबाइल आप डाउनलोड करा.
सातबारा मिळेल आता तुमच्या मोबाइल वर..! शेतकऱ्यांनो हे मोबाइल आप डाउनलोड करा.
आजकाल तंत्रज्ञानाचा वापर इतका जास्त झालाय कि लोकांच्या गरजेची वस्तू होऊन बसलाय..! काही झालं तरी आपल्याला मोबाइल लागतोच. मोबाइल हि एक तंत्रज्ञानाचाच भाग आहे.. असायला हि पाहिजे. टेकनॉलिजि नुसार आपणही पुढे गेलेच पाहिजे. त्यामध्ये होणारे नवनवीन बदल आपण स्वीकारलेच पाहिजेत.
जगात कुठेही काही एकादी गोस्ट घडली तर ती अवघ्या काही मिनिटात आपल्या पर्यंत पोहोचते. म्हणेजच जग आपल्या किती जवळ आलाय पहा.
सर्व क्षेत्रातील लोकांची प्रगती होत असताना जगाचा पोशिंदा आपला शेतकरी राजा मागे का राहील. आजकाल सर्व शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन आले आहेत. पण त्या स्मार्ट फोन चा वापर देखील स्मार्ट झालाच पाहिजे.
आजकाल आपल्याला शेतीच्या कागतपत्राशी संबंधित कुठलाही काम असेल तर तलाठी , किंवा प्रांत , तहसीलदार यांच्याकाडे जावे लागते. मग ते त्यांच्या वेळेनुसार भेटतात कधी तर कधी भेटत नाहीत. आणि भेटले तरी एका वेळेस गेल्यावर काम होईलच असे नाही. मग वरावांर हेलपाटे घाला त्यांच्या शिपायांच्या पुढे मागे करून काही काम करून घ्यावी लागतात.सर्वच ठिकाणी असा होत असा नाही पण पण असे प्रकार बऱ्याच ठिकाणी होतात.
पण आपण या गोष्टी टाळू शकतो कारण आपल्याकडे स्मार्टफोन आहे सध्या. आणि त्या स्मार्टफोन चा स्मार्ट वापर करण्यात आपल्या शेतकरी राजांनी देखील मागे राहिला नाही पाहिजे. आता सर्व शासकीय योजना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कर्ज घेण्यापासून ते कागदपत्रे काढण्यापर्यंत तसेच योजनांसाठी अर्ज करण्यापासून ते योजनेची अंमलबजावणी करण्यापर्यंत सर्व कामे ही ऑनलाइन केली जात आहेत.
आता तुम्ही तुमचा सातबारा देखील तुमच्या मोबाइलला मध्ये काढू शकत.
त्यासाठी लागणारी प्रोसेस मी आज सांगणार आहे.
आपल्या मोबाइल मध्ये प्ले स्टोर ला जावा.
त्यामधे उमंग हे अप्लिकेशन डाउनलोड करा.
किंवा https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.umang.negd.g2c या लिंक वर जाऊन देखील आपण उमंग हे ॲप्लिकेशन सहजतेने डाउनलोड करू शकता.
या अँप मध्ये पंधरा रुपये शुल्क आकारून सातबारा उतारा उपलब्ध होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, उमंग हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअर वर निशुल्क उपलब्ध आहे. जर आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर त्यामध्ये प्ले स्टोअर या एप्लीकेशन मध्ये जायचे आहे. या ठिकाणी आपणास उमंग हे नाव प्रविष्ट करायचे आहे. यानंतर तुमच्या स्क्रीनवर उमंग हे ॲप्लिकेशन दिसेल.