महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?हा प्रश्न सध्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला पडलाय.आपणा सर्वांना माहीतच आहे गेल्या २० तारखेला आपल्याला महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान झाले.आणि २३ तारखेला निकाल देखील जाहीर झाला.अर्थातच लागलेला निकाल हा सर्वांसाठी अनपेक्षित होता..!महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?हा प्रश्न सध्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला पडलाय
लागलेला निकाल हा एकतर्फी महायुतीच्या बाजूने होता तरीही आज ३ दिवस उलटून गेले तरी महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण असेल यावर अजूनही एकमत होऊ शकलेले दिसत नाही..! महायुतीमध्ये असणारे ३ पक्ष आणि पक्षातील नेतेमंडळी यांना प्रत्येकाला मुख्यमंत्री पद हे आपल्या पक्षाकडे असावे असं नक्कीच वाटत असणार आणि यातूनच मुख्यमंत्री निवडणे महायुती साठी मुश्किल होऊन बसलं आहे.आज सकाळपासून आपण बऱ्याच न्युज चॅनेल वर पाहतो आहोत कि देवेन्द्रजी फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावर निवड करण्यासाठी दिल्ली मधून शिक्कामोर्तब झाला आहे.परंतु तशी काही ऑफिसिअल स्टेटमेंट अजूनही भारतीय जनता पार्टी कडून जाहीर झालेले नाही.
विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त म्हणजेच १३२ जागा भारतीय जनता पार्टी ला मिळाल्या आहेत. अर्थातच जास्त जागा मिळाल्यामुळे भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहे आणि त्यांनी देवेन्द्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरु आहेत. परंतु निवडणूक सुरु असताना देवेन्द्रजी फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये नाही असा स्टेटमेंट दिला होता. मग आज जास्त जागा निवडून आल्यामुळे भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री पदासाठी दावा करत आहे अस वाटत.
बापदेव घाटात गँग रेप ! काय आहे प्रकरण ?
विधानसभा निवडणुकीमध्ये दोन नंबर चा पक्ष ठरला आहे तो म्हणजे शिवसेना(शिंदे गट). या विधानसभेत शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या आहेत. परंतु मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची लोकप्रियता पाहता परत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच करण्यात यावे असा दावा शिवसेना(शिंदे गट) यांच्याकडून करण्यात येत आहे. तसेच एकनाथजी शिंदे यांनी राबविलेली आणि गेम चेंजर योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. यामुळे महाराष्ट्रातील सर्व महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे. त्यामुळे नक्कीच शिवसेना(शिंदे गट) मुख्यमंत्री पदावर दावा करत आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये तीन नंबर चा पक्ष ठरला आहे तो म्हणजे राष्ट्रवादी (अजित पवार गट).या विधानसभेत राष्ट्रवादी पक्षाला ४१ जागा मिळल्या आहेत. त्यामुळे नक्कीच अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहे.
कार चालवताय…? या गोष्टी आहेत तुमच्यासाठी महत्वाच्या..!
या सर्व गोष्टी पाहता मुख्यमंत्री पदावर लवकर निर्णय होईल असा वाटत नाही.त्यावर पर्याय म्हणून अनेक फॉर्मुले तयार करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये अडीच-अडीच वर्षाचा फॉर्मुला असेल किंवा २-२-१ चा फॉर्मुला असेल. परंतु जेवढ्या जागा भारतीय जनता पार्टी च्या निवडून आल्या आहेत त्यावरून तरी असा वाटतंय कि भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री पदावर कोणत्याही प्रकारची तडजोड न करता ५ वर्षे मुख्यमंत्री पद स्वतःकडे ठेवतील अस वाटत आणि त्याचा प्रत्यय आज रामदासजी आठवले यांच्या बोलण्यात आला.
काय म्हणाले रामदासजी आठवले.
एकनाथजी शिंदे यांच्या सारख्या नेतृत्वाची दिल्ली मध्ये गरज आहे. त्यांनी दिल्ली मध्ये काम करावे असा रामदासजी आठवले म्हणाले. याचाच अर्थ महाराष्ट्रात मुख्यमंत्री पाचही वर्षे भारतीय जनता पार्टी चा राहील असा सध्यातरी दिसतंय.