भारताच्या सन्मानात आणखी एक मंच तुरा..! या राज्यातील इमारतींना मिळाला लंडन मध्ये सुंदर इमारतींचा अवॉर्ड..!
भारताच्या सन्मानात आणखी एक मंच तुरा..! या राज्यातील इमारतींना मिळाला लंडन मध्ये सुंदर इमारतींचा अवॉर्ड..!
तेलंगणातील ५ इमारतींना सुंदर इमारती साठी आंतरराष्ट्रीय ग्रीन अँपल अवॉर्ड २०२३ ने सन्मानित करण्यात आले.
यावेळी तेलंगणा चे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आनंद व्यक्त केला. तेलंगण सरकारच्या वतीने महापालिका प्रशासन आणि नगरविकास विभागाचे विशेष मुख्य सचिव अरविंद कुमार यांना प्रतिष्ठेचा “ग्रीन अँपल पुरस्कार” मिळाला आहे.
१६ जून रोजी लंडनच्या प्रतिष्ठित सेंट पॉल कॅथेड्रलमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. लंडनस्थित स्वतंत्र स्वयंसेवी संस्था ‘द ग्रीन ऑर्गनायझेशन‘ कडून तेलंगणाला ‘इंटरनॅशनल ब्युटीफुल बिल्डिंग्स‘साठी पाच ‘ग्रीन अँपल पुरस्कार’ मिळाले.
मोझम-जाही मार्केट (In the Heritage category – For the excellent restoration and reuse),
दुर्गाम चेरुवू केबल ब्रिज (In the Bridge category for the unique design),
डॉ. बी. आर. आंबेडकर तेलंगणा राज्य सचिवालय इमारत (In the aesthetically designed Office/workspace building category),
राज्य पोलिसांचे एकात्मिक कमांड कंट्रोल सेंटर (In the unique Office category),
यादगिरीगुट्टा मंदिर (In the excellent Religious structures category).
पहिल्यांदाच भारतातील कोणत्याही इमारतीला/ वास्तूंना प्रतिष्ठेचा ग्रीन अँपल पुरस्कार दिला जात आहे आणि तेलंगणाला पाचही पुरस्कार प्राप्त करण्याचा मान मिळाला आहे.
राज्याचे विशेष मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी सांगितले की, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन मॅनेजमेंट (एनआययूएम) च्या मदतीने विभागाने तेलंगण राज्य सरकारच्या वतीने अर्बन अँड रिअल इस्टेट सेक्टर अंतर्गत ‘इंटरनॅशनल ग्रीन अँपल अवॉर्ड्स फॉर ब्युटीफुल बिल्डिंग्स’ पुरस्कारासाठी अर्ज केला. या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ब्रिटनस्थित संस्थेकडून राज्याला यावर्षी सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाले हा अभिमानाचा क्षण आहे. हा पुरस्कार सोहळा १६ जून रोजी लंडन येथे झाला असून तेलंगण सरकारच्या वतीने अरविंद कुमार यांनी पुरस्कार स्वीकारतीला.
तेलंगण सरकारच्या वतीने लंडनमध्ये ग्रीन अँपल पुरस्कार प्राप्त अरविंद कुमार यांचे महापालिका प्रशासन आणि नगरविकास मंत्री के. टी. रामाराव यांनी अभिनंदन केले. तेलंगणसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. ही मान्यता शाश्वत शहरी विकास आणि स्थापत्य उत्कृष्टतेसाठी तेलंगणाच्या समर्पणाचा पुरावा आहे”.
इमारतींच्या ५ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये हा पुरस्कार तेलंगणा सरकार ने पटकावला.
ग्रीन अँपल ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना १९९४ मध्ये लंडन येथे झाली. हि एक नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आहे. हि संस्था पर्यावरण सुधारणे बाबत काम करते.
सन २०१६ पासून वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी काम करणारे देश, राज्यसंस्था , कंपनी , व्यक्ती यांना या पुरस्काराने सन्मानित करतात.जेणेकरून अजूनही लोक पर्यावरणाच्या उत्तम कामगिरी साठी पुढे येतील.