मनसे पक्षाचा राज्यपक्ष दर्जा रद्द होणार? नमस्कार मित्रांनो, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका आपल्या महाराष्टार्त चांगल्याच गाजल्या.अनेक दिग्गज नीते मंडळींना पराभवाचा सामना करावा लागला. ते तर आपण पहिलेच आहे. पण या सर्वांमध्ये आपण या वेळी पहिले कि राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला एकही आमदार निवडून अनंत नाही आला.इतकाच काय तर त्यांच्या मुलाला म्हणजेच अमित ठाकरे यांना देखील विजय मिळवता आला नाही.मनसे पक्षाचा राज्यपक्ष दर्जा रद्द होणार?
राज ठाकरे म्हणल कि सभांना लाखोंची गर्दी आणि मोठमोठ्या घोषणा होतात पण प्रत्यक्षात नागरिकांचा मतरूपी आशीर्वाद मात्र मनसे ला मिळायला तयार नाही.
आणि ये विधानसभा निवडणुकीमध्येय देखील आपल्याला हे पाहायला मिळालं. मनसे पक्षाची स्थापना केल्यानंतर माननीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माणसे चे १३ आमदार निवडून आले होते. त्यांनतर च्या निवडणूकीत २ आणि आता २०२४ च्या निवडणुकीत एकही जागा मनसे ला जिंकता अली नाही. मनसे कडून संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल १२३ उमेदवार उभे केले होते परंतु त्यापैकी एकही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही.मग प्रश्न पडतो कि मनसे ची राज्य पक्ष म्हणून जी काय मान्यता आहे ती राहील का रद्द होईल सविस्तर माहिती पाहुयात.
मनसे पक्षाची राज्यपक्ष हि मान्यता रद्द होईल का?
नक्कीच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी राज्यपक्ष हि मान्यता मिळवण्यासाठी कोणत्या अटी व शर्ती आहेत त्या जाणून घेणं गरजेचं आहे.
निर्वाचन आयोग राज्यघटना कलाम ३२४ अन्वये निवडणूक आयोग काम मकारात असताना राज्यपक्ष दर्जा टिकवण्यासाठी काही नियम घातलेले आहेत.ते नियम खालील प्रमाणे आहेत.
नियम क्रमांक १.
राज्यपक्ष दर्जा टिकविण्यासाठी विधानसभा निवडणुकीमध्ये टोटल मतदानाच्या ८% मतदान हे संबंधित पक्षाच्या उमेदवारांना पडायला पाहिजे.
महाराष्ट्र राज्यात एकूण मतदार आहेत ९.७० कोटी इतके त्यापैकी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण ६.७८ कोटी इतक्या मतदारांनी मतदान केले आहे. म्हणजेच मनसे पक्षाला सर्वांचे मिळून ६.७८ कोटी च्या ८% इतके मतदान मिळवणे गरजेचे होते. ६.७८ कोटी च्या ८% मतदान म्हणजेच कमीत कमी ४८ लाख २२ हजार इतके मतदान मनसे पक्षातील सर्व उमेदवारांना मिळायला हवे होते. पण त्यापेक्षा कित्त्येक पट कमी मतदान पक्षाला मिळले आहे. मनसे पक्षातील सर्व उमेदवारांना मिळून १ लक्ष ०२ हजार ५५७ इतकेच मतदान मिळाले आहे. त्यामुळे राज्यपक्ष दर्जा टिकवण्यासाठी च्या या अटी मध्ये मनसे पक्ष कुठेच बसत नाही.
नवीन पॅन कार्ड(Pan Card 2.0) येणार पहा त्या संदर्भात संपूर्ण माहिती.
नियम क्रमांक २.
राज्यपक्ष दर्जा टिकविण्यासाठी विधानसभा निवडणुकीमध्ये किमान २ आमदार निवडून यावेत आणि टोटल मतदानाच्या ६% मतदान हे संबंधित पक्षाच्या उमेदवारांना पडायला पाहिजे.
मनसे पक्षाचे जर त्यांचे २ आमदार निवडून आले असते आणि ६.७८ कोटी च्या ६% मतदान मिळवता आले असते तर मनसे पक्षाला त्यांची मान्यता टिकवता अली असती. परंतु दुरदैवाने मनसे पक्षाला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही.
महाराष्ट्रातील सर्वात कमी मतांनी निवडून आलेले १० उमेदवार.
नियम क्रमांक ३.
राज्यपक्ष दर्जा टिकविण्यासाठी विधानसभा निवडणुकीमध्ये किमान ३ आमदार निवडून यावेत आणि टोटल मतदानाच्या ३ % मतदान हे संबंधित पक्षाच्या उमेदवारांना पडायला पाहिजे.
मनसे पक्षाचे जर त्यांचे ३ आमदार निवडून आले असते आणि ६.७८ कोटी च्या ३% मतदान मिळवता आले असते तर मनसे पक्षाला त्यांची मान्यता टिकवता अली असती.परंतु दुरदैवाने मनसे पक्षाला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही.
म्हणजेच पक्षाचा राज्यपक्ष दर्जा टिकवण्यासाठी असणाऱ्या ३ अटींपैकी एकाही अट मनसे पक्ष बसत नाही. तर येत्या काळात मनसे पक्षाची मान्यता रद्द होते का काय याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिला आहे.