नवीन पॅन कार्ड(Pan Card 2.0) येणार पहा त्या संदर्भात संपूर्ण माहिती.मित्रांनो आपल्याला नव्या Pan Card 2.0 संदर्भात माहिती आहे का?
नसेल तर या लेखात आपण पाहणार आहोत नवीन पॅन कार्ड(Pan Card 2.0) येणार पहा त्या संदर्भात संपूर्ण माहिती. भारत सरकारने पॅन अपडेट करण्यासाठी Pan Card 2.0 सुरू केला आहे. या योजनेमध्ये जुने पॅनकार्ड अपडेट केले जाणार असून नव्या तंत्रज्ञानाने Pan Card देण्यात येणार आहे. या नवीन पॅनकार्ड वर QR कोड असणार आहे आणि ते आधी पेक्षा जास्त सुरक्षित देखील असणार आहे.या योजनेला Pan Card 2.0 प्रोजेक्टला प्राप्तिकर विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे.
Pan/TAN 1.0 इको सिस्टीम सुधारण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. Pan Card 2.0 कार्यक्रम हा त्याचाच एक भाग आहे. जुन्या प्रणालीला अपडेट करण्यासाठी आणला गेला आहे. मात्र, याबाबत नागरिकांच्या मनात अनेक शंका आहेत त्याबाबद्दल आपण आज ये लेखात आपण माहिती घेणार आहोत.
नवीन पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागतील का?
अनेक युजर्सच्या मनात प्रश्न असतो की, ते अपग्रेड कसे करता येईल, त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतील का? तर चिंता करू नका. आम्ही आज तुम्हाला नव्या Pan Card 2.0 यासंदर्भात सविस्तर माहिती देणार आहोत. याविषयी तुम्ही खाली जाणून घ्या.
महाराष्ट्रतील सर्वाधिक मताधिक्य असणारे १० आमदार.
Pan Card अपडेट म्हणजे नेमकं काय?
Pan Card 2.0 च्या मदतीने संपूर्ण सिस्टीम अपग्रेड केली जाणार आहे. ही प्रणाली ऑनलाईन आधारित असेल. मात्र, यासाठी युजर्सला पैसे मोजावे लागणार नाहीत. जुने Pan Card अपडेट केले जाईल आणि युजर्सना नवीन तंत्रज्ञानासह पॅन दिले जाईल. पॅन डेटाही अधिक सुरक्षित करण्यात येणार आहे. म्हणजेच पॅन युजर्सचा संपूर्ण डेटा अधिक सुरक्षित असेल. जर त्यांनी याचा वापर केला तर त्यांच्या डेटाचीही काळजी सरकार घेईल.
सांभाल उत्तरप्रदेश मधील हिंसाचार आणि त्याची कारणे-The Places of Worship act १९४७
Pan Card 2.0 मध्ये काय वेगळे काय असेल ?
Pan Card 2.0 याबद्दल बोलायचे झाले तर यात एक वेगळा QR कोड दिला जाईल. ते स्कॅन केल्यानंतर युजरची संपूर्ण माहिती सहज मिळू शकते. PAN अॅक्टिव्हिटीचीही काळजी घेतली जाणार आहे. अपडेट व्हर्जनमध्ये सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे. करदात्यांची नोंदणीही सुधारली जाणार आहे. मात्र, याबाबत अजूनही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुढील निर्णय सरकार घेईल.
पॅन डेटाही अधिक सुरक्षित केला जाईल.
नव्या पॅनमुळे अनेक गोष्टी सुलभ होतील. पॅन डेटाही अधिक सुरक्षित करण्यात येणार आहे. म्हणजेच पॅन युजर्सचा संपूर्ण डेटा अधिक सुरक्षित असेल. जर त्यांनी याचा वापर केला तर त्यांच्या डेटाचीही काळजी सरकार घेईल.