सांभाल उत्तरप्रदेश मधील हिंसाचार आणि त्याची कारणे.आज आपण पाहतो आहोत गेल्या काही दिवसात सांभाल उत्तरप्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणात दंगे भडकेल आहेत. पोलीस आणि नागरिकांमध्ये दगडफेक असे प्रकार घडत आहेत आज आपण ये लेखात पाहणार आहोत सांभाल उत्तरप्रदेश मधील हिंसाचार आणि त्याची कारणे.
सांभाल मधील हिंसाचार आणि त्याची कारणे पाहण्याआधी आपल्या सर्वाना हे समजून घेणे गरजेचं आहे कि The Places of Worship Act १९४७ काय आहे आणि तो आपल्याला काय सांगतो.The Places of Worship Act १९४७ सांगतो कि कोणत्याही प्रार्थनास्थळाचे धर्मांतर करण्यास मनाई आहे आणि 15 ऑगस्ट, 1947 रोजी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही प्रार्थनास्थळाच्या धार्मिक वैशिष्ट्याची देखभाल करण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींसाठी हा कायदा करण्यात आला होता. अधिनियमात कोणतीही गोष्ट, उत्तर प्रदेश राज्यातील रामजन्मभूमी स्थळाला लागू होणार नाही. (म्हणून हा नियम अयोध्या राम जन्मभूमीला लागू नसल्याने कोर्टात निकाल लागला आणि आता त्याठिकाणी मंदिर उभारलं जात आहे). म्हणजेच राम मंदिर चा विषय बाजूला ठेवला तर इतर कुठल्याही मंदिर असतील मस्जित असतील किंवा गुरुद्वार अथवा चर्च असतील तर ते त्यांच्यामध्ये कुठलाही बदल करण्यास सक्त मनाई आहे. मग त्या पूर्वी इतिहासात त्या ठिकाणी कोणतेही धार्मिक स्थळ असो. १९४७ मध्ये जे धार्मिक स्टाल त्या ठिकाणी आहे त्यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार आंही असा कायदा म्हणजे The Places of Worship act १९४७. तसेच याच कायद्यामध्ये अशी देखील तरतूद आहे कि या नंतर कुठलाही कायदा आणून प्रार्थनास्थळाचे धर्मांतर करण्यात येणार असेल तर असा कुठलाच कायदा ग्राह्य धरला जाणार नाही.
महाराष्ट्रातील सर्वात कमी मतांनी निवडून आलेले १० उमेदवार.
The Places of Worship act १९४७ कायदा करण्यामागची कारणे.
मित्रांनो आपल्या भारतात हजारो वर्षांपासून सर्व जाती धर्मांचे लोक राहतात.तसेच आपल्या भारत देशावर बऱ्याच इतर देशांनी राज्य देखील केले आहे. ठिकठिकाणी अनेक धार्मिक स्थळे पडून इत्तर धर्मांची धार्मिक स्थळे बनविण्यात आली आहेत. म्हणजेच जर असे सर्वे करत आपण बसलो तर प्रत्येक ठिकाणी काही तरी नवीन शोध लागेल आणि धर्म-धर्मांमंध्ये तेढ निर्माण होऊन दंगे होतील. आणि ते टाळण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला होता.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?
सांभाल उत्तरप्रदेश मधील हिंसाचार आणि त्याची कारणे.
आता आपण समजून घेऊयात कि सांभाल मधील हिंसाचार चालू आहे ते कशामुळे चालू आहेत. याची सुरवात झाली ती म्हणजे मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली एका कमिटी ने ऑगस्ट २०२३ मध्ये ज्ञानवापी मस्जित चा सर्वे करण्यास सांगितला.आणि या सर्वे मधून हि माहिती घेण्यास सांगितलं कि या मस्जित च्या खाली मंदिराचे अवशेष मिळतात का? या सर्व मधून ते काय सध्या करणार होते माहित नाही पण यामुळे The Places of Worship act १९४७ कायद्याचं उल्लंघन होणार होत हे मात्र नक्की. म्हणजेच ज्या गोष्टी होऊ नये म्हणून एक कायदा आणला आणि त्याच कायद्यच उल्लंघन झालं तर नक्कीच हिंसाचार तर होणारच आणि याच गोष्टीमुळे असाच सर्वे करण्यासाठी दुसऱ्या वेळेस ज्यावेळी लोक गेली त्यावेळी तेढ निर्माण होऊन सांभाल मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे.